आता ‘मुन्नी’ ऐवजी ‘मुन्ना’ बदनाम ! ‘भाईजान’ सलमानच्या ‘दबंग 3’ मधील न्यू साँग ‘रिलीज’ (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार सलमान खानच्या दबंग 3 या सिनेमातील मोस्ट अवेटेड साँग ‘मुन्ना बदनाम हुआ’ रिलीज झालं आहे. सलमान खानने हुड हुड दबंग, नैना लडे आणि युं करके या गाण्यांचं ऑडिओ रिलीज केल्यानंतर आता मुन्ना बदनाम हुआ हे गाणं रिलीज केलं आहे. हे गाणं 2010 मधील दबंग सिनेमातील प्रसिद्ध गाणं मुन्नी बदनाम हुई पासून इंस्पायर आहे. हे गाणं चार्टबस्टर बनलं आहे. त्यामुळे आता मुन्ना बदनाम हुआ या गाण्याकडूनही आता हीच अपेक्षा आहे.

हे गाणं शेअर करताना सलमान म्हणतो की, “कमाल खानचा आवाज, बादशाहचा रॅप, चुलबुलची दबंगाई. ऐका!” हे गाणं रिलीज होताच चाहत्यांनी हे गाणं चार्टबस्टर गाणं म्हणून घोषित केलं आहे. सध्या सर्व गाणे ऑडिओ स्वरुपात रिलीज करण्यात आले आहेत. या गाण्यांच्या व्हिडीओसाठी चाहत्यांना थोडी प्रतिक्षा करावी लागणार आहे.

दबंग रिलीज झाल्यानंतर तब्बल 7 वर्षांनंतर सलमान खान चुलबुल पांडेच्या रुपात पडद्यावर परत येत आहे. जेव्हापासून सलमान आणि अरबाज खानने दंबग 3 सिनेमाची अनाऊंसमेंट केली आहे तेव्हापासून चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

 

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like