कौतुकास्पद ! न्यूझीलंडच्या संसदेत सभापतींनीच गे सहकाऱ्याच्या बाळाला पाजलं दूध (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संसदेत सभापती हे शांतता राखण्याचे तसेच कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी प्रयत्न करत असतात. मात्र न्यूझीलंडमधील संसदेतून व्हायरल झालेल्या एका फोटोमुळे येथील सभापतींचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव देखील होत आहे. यात हे सभापती एका खासदाराच्या मुलाला दूध पाजताना दिसून येत आहे. त्यामुळे एका बाजूला व्यवस्थित कामकाज पार पाडण्याबरोबरच खासदाराच्या मुलाला दुध पाजण्याची जबाबदारी देखील ते व्यवस्थित पार पाडत असल्याचे दिसून आले.

न्यूझीलंडमधील टॉम कॉफी हे खासदार आपल्या मुलाला घेऊन संसदेत आले असता कामकाज सुरु असताना बाळ अचानक रडायला लागले. यावेळी सभापतींनी त्यांच्या बाळाला सांभाळायला घेतले. त्यानंतर त्यांनी आपल्या आसनावर मांडी घालत या बाळाला दुध पाजण्याबरोबरच सहकारी खासदारांचे म्हणणे देखील ऐकून घेतले. त्यांनी या सर्व प्रकाराची माहिती ट्विट करून दिली. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं कि, काल संसदेत एक खास पाहुणा आला होता. सामान्यपणे सभापतींच्या खुर्चीवर केवळ सभापतीच बसतात. मात्र आज या विशेष पाहुण्याने माझ्याबरोबर खुर्ची शेयर केली. त्याचबरोबर त्यांनी ज्या खासदार सदस्याचे हे मूल होते त्यांचे देखील अभिनंदन केले.

दरम्यान, खासदार टॉम कॉफी आणि त्यांच्या समलैंगिक साथीदार हे दोघे जण सरोगसीचा मदतीने पालक झाले असून जुलै महिन्यात त्यांच्या या मुलाचा जन्म झाला आहे. सभापतींच्या या कृत्यावर मोठ्या प्रमाणात कौतुकाचा वर्षाव होत असून विविध लोकांनी ट्विटरवरून त्यांचे कौतुक केले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –