Coronaviurs : आज राज्यात 4 हजार 395 रुग्णांना डिस्चार्ज, रिकव्हरी रेट 93.60 %

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना रुग्णांचा घसरत असलेला आलेख सध्या कायम आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणांना दिलासा मिळाला आहे. दिवसभरात 4 हजार 395 रुग्णांनी करोनावर मात केली. राज्यातल्या बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ही 17 लाख 66 हजार 10 झाली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट (Recovery Rate) 93.60 टक्के म्हणजेच 94 टक्क्यांच्या जवळ गेला असून हा उच्चांकी दर आहे.

गेल्या 24 तासांमध्ये 3 हजार 442 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 70 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातल्या रुग्णांची एकूण संख्या ही 18 लाख 86 हजार 807 झाली आहे. त्यापैकी 17 लाख 66 जण बरे झाले आहेत. उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही घट झाली असून राज्यात सध्या 71 हजार 356 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मुंबईत 403 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही सभागृहात बोलताना राज्यातला कोरोनाचा आलेख घसरणीला लागला असला तरी धोका कमी झालेला नाही, असं म्हटंल आहे. ते म्हणाले, धारावी मॉडेलचे कौतुक जगाच्या पातळीवर केलं गेलं.