‘काश्मीर’मध्ये उभी राहिली नवीन ‘दहशतवादी’ संघटना TRF, हंदवाडा हल्ल्याची घेतली जबाबदारी

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडा येथे झालेल्या दहशतवादी चकमकीची जबाबदारी लष्कर-ए-तोयबा च्या द रजिस्टेंस फ्रंट ने घेतली आहे. विशेष म्हणजे या दहशतवादी चकमकीत दोन सैन्य अधिकाऱ्यांसह पाच सैनिक शहीद झाले.

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी संघटनांमध्ये वर्चस्व मिळविण्याची लढाई सुरू झाली आहे. लष्कर-ए-तोयबाच्या रजिस्ट्रेशन फ्रंट (टीआरएफ) चे प्रयत्न आहेत की ते कशाही पद्धतीने हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेला कमकुवत करू शकतील. वर्चस्वाच्या याच युद्धामध्ये शनिवारी सायंकाळी उशिरा लष्कराची दहशतवादी संघटना टीआरएफने भारतीय सैन्याला लक्ष्य केले. हिजबुलला अपमानित करण्यासाठी आता या चकमकीची जबाबदारी दहशतवादी संघटनेने घेतली आहे.

उत्तर-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडाच्या चांजमुल्ला भागात एका घरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी काही नागरिकांना बंदी बनवले होते. माहितीच्या आधारे जम्मू-काश्मीर पोलिसांसह सैन्याच्या एका पथकाने परिसर घेरला आणि सर्व नागरिकांची सुटका केली. मिळालेल्या माहितीनुसार जेव्हा बंदी बनवण्यात आलेल्या लोकांची सुटका करण्यात आली तेव्हा दहशतवाद्यांनी बचाव पथकावर जोरदार गोळीबार केला. दोन्ही बाजूंच्या चकमकीत सैन्य अधिकारी कर्नल आशुतोष शर्मा आणि मेजर अनुज सहित दोन सैनिक आणि जम्मू-काश्मीर पोलिस उपनिरीक्षक शकील काझी हे शहीद झाले.

कर्नल आणि मेजर यांच्यासह 5 सैनिक शहीद

चांजमुल्ला भागात शनिवारी रात्री उशिरापर्यंत सुरु असलेल्या दहशतवादी चकमकीत एक कर्नल, एक मेजर, दोन सैन्य कर्मचारी आणि एक पोलिस उपनिरीक्षक शहीद झाले. शहीद झालेल्यांमध्ये कर्नल आशुतोष, मेजर अनुज, पोलिस उपनिरीक्षक शकील काझी, एक लांस नायक आणि एक रायफलमॅन यांचा समावेश आहे. कर्नल आशुतोष शर्मा यांनी अतिरेक्यांविरूद्ध अनेक ऑपरेशन्स यशस्वीरित्या पूर्ण केली आहेत, पण या चकमकीत त्यांनी आपला जीव गमावला.