किनवट पोलिसांची धकड कारवाई ! अल्पवयीन मुलीसोबत ‘लगट’ करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या

किनगाव/अहमदूपर : पोलीसनामा ऑनलाइन – मोल मजुरी करुन उपजिवीका भागवणाऱ्या मुलीवर अतिप्रसंग करुन मोकाट फिराणाऱ्या दोन आरोपींच्या किनगाव पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या नराधमांनी वेळोवेळी या भोळसर मुलीवर अतिप्रसंग केला. पीडित अल्पवयीन मुलगी (वय-17) अहमदपूर तालुक्यातील चिखली गावची रहिवाशी असून वडीलांच्या निधनानंतर ती आईसोबत सताळा येथील मामाकडे राहण्यास आली आहे. ती आणि तिची आई गावात मिळेल ते काम करुन उपजिवीका भागवत आहे.

लहू बालाजी वाघमारे (रा. सताळा, ता. अहमदपूर) आणि अस्लम इमाम तांबोळी असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. याप्रकरणी पीडित मुलीने किनगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना विशेष दंडाधिकारी यांनी चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही मुलगी स्वभावाने भोळसर आणि गरीब असल्यामुळे त्याचा फायदा घेत गावातीलच दोन नराधामांनी तिच्यासोबत जवळीकता करून तिला प्रेमाचे अमिष दाखवत तिच्यावर वारंवार अतिप्रसंग केला. याप्रकरणी पीडित मुलीने किनगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादेमध्ये तिने सांगितले की, या नराधमांनी 3 महिने वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अतिप्रसंग केला. तसेच याची कुठे वाच्चता केल्यास जीवे मारून टाकण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले.

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी नराधमांचा शोध घेऊन त्यांना अटक केली. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक खुब्बा चव्हाण, पोलीस उपनिरी७क अन्सापुरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल शिरसाठ यांनी ही कारवाई केली.