आसारामच्या सूनेचा खळबळजनक खुलासा ! नवरा आणि सासऱ्यानं माझ्या सोबत बऱ्याच वेळा….

खजराणा/मध्य प्रदेश : वृत्तसंस्था – आसाराम याच्या सुनेने नवरा आणि सासऱ्याची पोलखोल केली आहे. आसरामची सून आणि मुलगा नारायण साईची पत्नी (वय-38) जानकीने खजराणा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तिने दिलेल्या तक्रारीत म्हटले म्हटले आहे की, लग्नानंतर तिच्या पतीने तिच्या डोळ्यासमोर अनेक महिलांसोबत अनैतीक संबध ठेवले होते. त्यामुळे त्यांना मानसीक त्रास सहन करावा लागला. तसेच सासरा आसाराम आणि त्याचा मुलगा नारायण साई यांनी छळ केल्याचा आरोप करत पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. तसेच तिने बाप-लेकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची विनंती केली आहे. सध्या दोघेजण वेगवेगळ्या तुरुंगात आहेत.

तिने असेही आरोप केले की, माझ्या पतीने नेहमीच धर्माच्या नावावर ढोंग केले आहे. माझ्या पतीने सर्वात मोठा गुन्हा केला आहे. तो म्हणजे त्याच्या आश्रमात एका महिला साधिकेसोबत अनैतिक संबंध ठेवले. ज्यावेळी ही महिला गर्भवती झाली तेव्हा त्याने मला पुन्हा लग्न करण्याची इच्छा असल्याचे सांगितले. जानकीने आरोप केला आहे की जेव्हा तिने नारायणला घटस्फोट देऊन दुसरे लग्न करण्यास सांगितले तेव्हा पतीने सांगितले की त्याने महिलेसोबत राजस्थानमध्ये लग्न केले असून त्या महिलेपासून त्याला एक मुल देखील झाला आहे.

पोलिसांनी दाखल करून केलेल्या तक्रारीत त्यांनी आसारामवर आरोप केले की तोही त्यांच्यावर दबाव टाकत होता. एवढेच नाही तर त्यांच्या वडिलांनी देवराज कृष्णां यांनी त्यांची बरीच संपत्ती आसारामच्या दबावाखाली येऊन स्वयंभू संत भोपाळ येथील आश्रमाला दान केली.खरजाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर त्रिपाठी यांनी आसाराम आणि नारायण विरोधातील जानकीने दिलेली तक्रार दाखल करुन घेतल्याचे सांगितले. त्रिपाठी यांनी सांगितले की, या तक्रारीची चौकशी करून आम्ही योग्य कायदेशीर पवले उचलू. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर जानकीने पत्रकारांना सांगितले की, जेव्हा मी माझ्या पतीच्या इतर महिलांशी अनैतीक संबंध ठेवल्याबद्दल आक्षेप घेतला तेव्हा ते मल धमकावत होते. तसेच मला शांत राहण्यास सांगत होते.

मागील काही दिवसांपासून जानकी पतीपासून विभक्त राहत आहे. तीने सांगितले की, पती नारायण साई याच्याविरोधात कौटुंबीक हिंसाचार व देखभालीची स्वतंत्र प्रकरणे स्थानिक न्यायालयात दाखल केली आहेत. त्यानंतर नारायण साई याने माझ्या कुटुंबियांना आणि नातेवाईकांना फोन करून खटला मागे घेण्यासाठी धमकी दिली जात होती.