‘तो’ फिल्मी स्टाईलने पोलिसांच्या हातून निसटला ; अन् त्याच स्टाईलने पकडला गेला 

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईनआरोपीला घेऊन पोलीस सबजेल येथे गेले असता तो  पोलिसांच्या हाताला हिसका देऊन बेड्यासह पळाला. परंतु पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले. आज नगर सबजेल आवारात ही घटना घडली.

याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, किरण उर्फ कुबड्या दशरथ पालवे (रा. नागापूर,  एमआयडीसी) याला एमआयडीसी पोलिसांनी एका गुन्ह्यात अटक केली होती. न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली होती. त्यामुळे सदर आरोपीस सबजेल येथे जमा करण्यासाठी एमाआयडीसी पोलीस गेले होते. परंतु सबजेल आवारात येताच त्याने पोलिसांच्या हाताला जोराचा हिसका दिला व पळून गेला. पोलिसांनी पाठलाग करून काही वेळातच त्याला पकडले.
याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी दशरथ कटारे यांच्या फिर्यादीवरून कुबड्या पालवे यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.