अहमदनगर : मनपातील नवीन सफाई कामगार संघटनेवरून वाद

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – महापालिकेत सफाई कामगारांची नवीन कामगार संघटना स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महापालिकेत यापूर्वी अनंत लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली जुनी सफाई कामगार संघटना कार्यरत आहे. असे असतानाही नवीन कामगार संघटना स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू झाल्याने त्यांच्यातील वाद उफाळून आला आहे. पहिल्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घरात घुसून दमदाटी केल्याची फिर्याद दिल्याने तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे महापालिकेची सफाई कामगारांची अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.

याबाबत जितेंद्र चव्हाण यांची पत्नी अनिता चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझे पती जितेंद्र चव्हाण हे महापालिकेत सफाई कामगार म्हणून नोकरीस आहेत. महापालिकेत सफाई कामगार संघटना असून त्याचे अध्यक्ष अनंत लोखंडे आहेत. या संघटनेत माझे पती सदस्य म्हणून आहेत. १३ जून २०१९ रोजी महापालिकेत नवीन संघटना काढण्यात आली. त्यात माझ्या पतीसह तानसेन सुरेश बिवाल व इतर सफाई कामगार या संघटनेच्या स्थापनेसाठी चव्हाण हे नवीन संघटनेतील पदाधिका-यांसोबत शाखा स्थापन करण्यासाठी महापालिकेत गेले होते. त्याचा राग मनात धरून माझ्या घरी विजय पठारे व इतर तीन जण काल गुरुवारी(दि.१३) घरात घुसले. तुझ्या पतीला समजावून सांग, तो जास्त शहाणा झाला आहे का?
महापालिकेत एक संघटना आहे तू हे चुकीचे करत आहे. संघटना एकच राहील. असे म्हणून मारण्याची धमकी दिली.

सफाई कामगार संघटनेच्या स्थापनेवरून वातावरण तापल्यावर त्याला वेगळे स्वरूप प्राप्त झाले आहे. जुन्या संघटनेकडून नवीन संघटना स्थापन केली जाऊ नये, यासाठी दबाव निर्माण केला जाऊ लागला आहे.

सिने जगत –

#Video : भोजपुरीचं सर्वात लोकप्रिय ‘ऑनस्क्रीन’ कपल झालं ‘विभक्‍त’ ; पण, त्यांचा जुना व्हिडीओ घालतोय धुमाकूळ

कतरिना कैफने करिअरबाबतीत केला ‘हा’ मोठा खुलासा

#Video : ‘बाहुबली ३’ चित्रपटाचे निर्देशन ‘या’ निर्मात्याने केले पाहिजे : तमन्ना भाटिया

अर्जुन कपूरच्या शर्टलेस फोटोला पाहून ‘थक्क’ झाली मलायका, म्हणाली……