अहमदनगर : भंडारदरा धरण भरले, पाण्याचा विसर्ग

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – आज दुपारी भंडारदरा धरण तांत्रिकदृष्ट्या भरले आहे. दुपारी दोन वाजता धरणाचा पाणीसाठा 10 हजार 500 दशलक्ष घनफूट झाला आहे. धरणातून सध्या वीजनिर्मिती द्वारे 825 क्यूसेक, तसेच स्पिलवे द्वारे 3600 क्यूसेक असे एकूण 4 हजार 425 क्यूसेकने धरणातून पाणी सोडण्यात आले आहे.

मागच्या वर्षी 9 ऑगस्टला धरण भरले होते

भंडारदरा धरणातून सोडण्यात आलेला विसर्ग निळवंडे धरणात येणार असल्यामुळे लगेच प्रवरा नदीतील प्रवाह वाढणार नाही. निळवंडे धरणाचा पाणीसाठा 4500 द.ल.घ.फू. आहे. निळवंडे धरण भरल्यानंतर प्रवरा नदीत विसर्ग सोडण्यात येईल. प्रवरा नदीकाठच्या गावांना सध्या कुठल्याही प्रकारचा धोका नाही. धरणातील विसर्ग वाढवताना वेळोवेळी महसूल व पोलिस विभागांना कळविण्यात येईल.

मुळा धरणातील आवक वाढली
भंडारदरा धरण भरलेले असताना जिल्ह्यातील सर्वात मोठे असलेल्या मुळा धरणातही पाण्याची आवक वाढली आहे. महाराष्ट्रात झालेल्या पावसामुळे धरण साठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे नगरकरांना सुटकेचा निश्वास सोडला. या धरणातून नगर शहरासाठी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like