#Loksabha : भरारी पथकातील ‘त्या’ कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

८५-भोकर मतदार संघातील कारवाई

नांदेड :  पोलीसनामा ऑनलाइन – (माधव मेकेवाड) लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ करिता कर्तव्यावर कसूर करणाऱ्या ८५-भोकर मतदार संघातील भरारी पथकात समावेश असलेल्या एका कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एस.एस. राठोड (लिपिक, तालुका कृषी कार्यालय अर्धापुर) असे गुन्हा दाखल झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – २०१९ करिता भरारी पथकात नियुक्त करण्यात आलेले कर्मचारी एस.एस. राठोड हे दिनांक १५ मार्च २०१९ पासून विनापरवानगीने कर्तव्यावर गैरहजर होते. निवडणूकीसारख्या संवेदनशील व महत्वाच्या कामात त्यांनी जाणीवपूर्वक कर्तव्यावर दुर्लक्ष केले असल्याने मा. पवन चांडक (सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, ८५-भोकर विधानसभा मतदारसंघ) यांचे आदेशान्वये दिनांक १९ मार्च २०१९ रोजी पोलीस ठाणे अर्धापुर इथे श्री. शिवाजी जोगदंड (नायब तहसीलदार, अर्धापुर) यांनी एस. एस. राठोड (सदस्य भरारी पथक) यांचे विरुद्ध लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ चे कलम १३४ अन्वये गुन्हा नोंदविला आहे.

Loading...
You might also like