चाकण दंगलीच्या पोलिसांनी केलेल्या तपासावर मराठा समाजात असंतोष

चाकण : पोलीसनामा ऑनलाइन – आरक्षणासह विविध मागण्यासाठी गतवर्षी मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या बंद दरम्यान चाकणमध्ये मोठा हिंसाचार घडला आणि दंगल झाली होती. त्या घटनेला आता एक वर्ष पूर्ण होत आलंय. मात्र, पोलिसांनी केलेल्या दंगलीच्या तपासामुळे सध्या परिसरात तणावाच वातावरण निर्माण झालं आहे. पोलिसांनी केलेल्या तपासावर मराठा समाजातील नेते आणि कार्यकर्ते नाराज असून त्यांच्यामध्ये प्रचंड असंतोष पहावयास मिळत आहे.

गतवर्षी चाकण येथे झालेल्या हिंसाचारात राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील यांचा क्रिमरोल होता असं काहीस पोलिसांच्या तपासात निष्पन्‍न झाल्याच बोलल जात आहे. मोहिते-पाटलांच्या अटकेसाठी गेल्या काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवड आयुक्‍तालयातील बडे अधिकारी आणि मोठा फौजफाटा चाकणमध्ये तळ ठोकून बसला होता अशी देखील चर्चा आहे.

गतवर्षी ३० जुलैला नेमकं काय झालं

मराठा क्रांती मोर्चाने ३० जुलै रोजी बंद पुकारला होता. चाकण येथे बंदचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याच दिवशी दिलीप मोहिते-पाटील आणि इतर राजकीय पक्षाच्या अनेक नेत्यांनी भाषणं केली. त्यामध्ये राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातील आपलं आश्‍वासन पाळल नसल्याचे सांगण्यात आले आणि सरकारच्या निषेधार्थ भावना व्यक्‍त करण्यात आल्या. भाषणादरम्यान मोहिते-पाटील यांनी कोणतही चिथावणीखोर भाष्य केल्याचं कोणालाही आठवत नाही. भाषण संपल्यानंतर मोहिते-पाटील हे पुण्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एका बैठकीला रवाना झाले आणि त्यांनी त्या बैठकीत त्यांनी सहभाग देखील घेतला होता असं ठामपणे काही मोहिते-पाटील समर्थक सांगतात.

११ महिन्यानंतर आता नेमकं काय झालं

हिंसाचारादरम्यान घडलेल्या दंगलीचा तपास चालु होता. आता अचानक असं नेमकं काय झालं की दंगलीत मोहिते-पाटलांचा क्रिमरोल असल्याचं बोललं जावु लागलं. पोलिसांच्या तपासात नेमकं काय निष्पन्‍न झालं की लोकप्रतिनिधी मोहिते-पाटलांच्या अटकेसाठी मोठा फाटा चाकण येथे रवाना करण्याची गरज भासली. दरम्यान, मोहिते-पाटील यांच्यावर नेमका कोणता गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि नेमकी काय कारवाई झाली आहे याबाबत देखील कोणी माहिती देण्यास तयार नसल्याचं मोहिते-पाटलांच्या समर्थकांकडून सांगण्यात येतय. समर्थक वेगवेगळया ठिकाणी त्याबाबत विचारणा करीत आहेत.

मराठा समाजातील कार्यकर्त्यांमध्ये असंतोष

पोलिसांच्या भूमिकेमुळे चाकण परिसर आणि खेड तालुक्यातील मराठा समाजातील कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष पहावयास मिळत आहे. दरम्यान, अटकेसंदर्भातील बातम्या वेळावेळी प्रसिध्द होत असल्याने आणि पोलिसांचा फौजफाटा एकदा धडकून गेल्याने दिलीप मोहिते-पाटील यांनी राजगुरूनगर न्यायालयात अटकपुर्व जामिनासाठी धाव घेतली. मात्र, मोहिते यांना पोलिस का अटक करणार आहेत हे माहित नाही. ती माहिती सांगितल्यानंतरच मेहरबान कोर्ट जामिन अर्जावर सुनावणी करणार असल्याची माहिती मोहिते यांचे वकिल हर्षद निंबाळकर यांनी दिली आहे. मात्र, जवळपास वर्षभरातनंतर एकदम काय झालं की निवडणूका जवळ आल्यामुळं असं होतय अशी चर्चा सध्या परिसरात चालु आहे.

आमच्याकडे भक्‍कम पुरावा : पोलिस आयुक्‍त पद्मनाभन

चाकण येथे झालेल्या दंगलीचे व्हिडीओ आणि ऑडिओ फुटेज तपास अधिकार्‍यांनी तपासलेलं आहे, दंगलीचा कोण सुत्रधार होतं हे दोषारोपपत्रामध्ये येईलच पण आमच्याकडे दंगड करणार्‍यांच्याविरूध्द भक्‍कम पुरावा असून कारवाई होणारच असे पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्‍त पद्मनाभन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

सावधान ! साबण आणि टूथपेस्ट ने होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार

 जिरे-आल्या चा रस प्या ! १० दिवसात पोट कमी करा

 कॅन्सर च्या उपचाराचा दावा करणाऱ्या मार्केटमुळे जगभरातील डॉक्टर चिंतेत !

 डायनिंग टेबलपेक्षा जमिनीवर बसून जेवण करणे योग्य ; जाणून घ्या फायदे

 खुशखबर ! १००० हून अधिक ‘औषध -गोळ्या’ होणार स्वस्त

‘परफेक्ट’ लिपस्टिक लावण्यासाठी काही खास टिप्स – जाणून घ्या