हुतात्मा बाबू गेनू मित्र मंडळानं साकारली शनिवारवाड्याची 105 फूट आकर्षक प्रतिकृती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील ‘नवसाचा गणपती’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या हुतात्मा बाबू गेनू मंडळाने यंदा पुण्यातील प्रसिद्ध शनिवारवाड्याची आकर्षक अशी प्रतिकृती साकारली आहे. यंदा मंडळ ५० व्या वर्षात पदार्पण करत आहेत. पुण्यातील शनिवारवाड्याची भव्य ७ मजली काल्पनिक इमारत मंडळाने उभी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रसिद्ध सिनेआर्टिस्ट नितीन चंद्रकांत देसाई यांनी ही शनिवाड्याची प्रतिकृती उभी केली आहे. त्यांनी पानिपत चित्रपटात साकारलेल्या काल्पनिक शनिवाड्याची ७ माजली अशी भव्य प्रतिकृती मंडळाने देखाव्या स्वरूपात उभारली आहे. मंडळासोबतच या भव्य प्रतिकृतीला उभे करण्यामागे ६० कामगारांचे गेल्या २ महिन्यांपासूनची मेहनत कमी आली आहे.

पुण्यातील प्रसिद्ध प्रेक्षणीय स्थळ असलेल्या शनिवार वाड्याची प्रतिकृती मंडळाने अत्यंत आकर्षक पद्धतीने उभारली आहे. ७ मजली अश्या या प्रतिकृतीला करण्यात आलेली नयनरम्य रोषणाई भाविकांचे लक्ष्य वेधून घेत आहे. काल्पनिक अश्या या शनिवारवाड्याच्या प्रतिकृतीला विविध झुंबरांचा वापर करून आकर्षक बनविले आहे. देखाव्या सामोरीळ २ सुंदर पाण्याचे कारंजे देखाव्याची शोभा वाढवत आहेत. त्याचबरोबर शनिवाड्याचा बुरुंज देखील उभारण्यात आला असून १०५ फूट उंच असा हा देखावा उभारण्यात आला आहे.

५० वर्ष जुन्या असलेल्या या नवसाच्या गणपतीच्या मूर्तीला आकर्षक दागिन्यांनी मढविले आहे १९७० मध्ये या हुतात्मा बाबू गेनू मंडळाची स्थापना करण्यात आली होती. नवसाचा मानलेला जाणारा ह्या गणपतीला दरवर्षी हजारो भाविक भेट देतात. भाविक नवसाचे धागे बांधून आपली गाऱ्हाणी या गणपतीपुढे मांडतात.

You might also like