जयदत्त क्षीरसागर यांना कुणीच प्रवेश दिला नसता : मुंडे

मुंबई : वृत्तसंस्था – राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्या शिवसेना प्रवेशावर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी समाचार घेताना लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर क्षीरसागर यांना कुणीच प्रवेश दिला नसता अशा शब्दात अवहेलना केली आहे.त्यामुळे आरोप – प्रत्यारोप होण्याची चिन्हे आहेत.

लोकसभा निवडणुकीत लागणाऱ्या निकालातील महाआघाडीचा लीड पाहून क्षीरसागर यांना कुणीच प्रवेश दिला नसता म्हणून त्यांनी आजचा मुहूर्त निवडला असा टोला मुंडेंनी यावेळी लगावला. उद्या लोकसभा निवडणुकीचे निकाल लागणार आहे.

बीड जिल्ह्यात सर्वात जास्त लीड महाआघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना मिळणार असा विश्वासही मुंडे यांनी व्यक्त केला.
धनंजय मुंडे म्हणाले कि,  क्षीरसागर यांनी अगोदरच पक्षप्रवेश करायला पाहिजे होता. लोकसभा निवडणुकीत त्यांनी युतीच्या उमेदवाराचा प्रचार केला. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट सुद्धा घेतली होती. त्यामुळे हा प्रवेश औपचारिकता आहे अशी टीकाही मुंडेंनी यावेळी केली.

Loading...
You might also like