फायद्याची गोष्ट ! जिओच्या 10 रूपयांच्या रिचार्जवर 1 GB डेटा अगदी मोफत, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मागील वर्षी सर्व टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या प्रीपेड प्लॅनच्या दरात मोठी वाढ केली. यात एरटेल, वोडाफोन सोबतच रिलायन्स जिओनेही जिओने IUC चार्ज आकारत आपल्या प्रीपेड प्लॅनमध्ये बदल केले. प्लॅनच्या किंमतीत केलेली वाढ सोबतच जिओने अन्य नेटवर्कवरील अनलिमिटेड कॉलिंग सेवाही बंद केली. त्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजीचा सूर दिसून आला.

त्यांनतर जिओने अन्य नेटवर्कवर कॉल करण्यास ग्राहकांना नॉन जिओ मिनिट्स सुरु केले. अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी ६ पैसे प्रति मिनिट आकारणी होऊ लागली होती. हे नॉन जिओ मिनिट्स संपल्यानंतर ग्राहकांना टॉप अप करावा लागतो. यासाठी जिओने खास ऑफर दिली आहे.

जिओचा १० रुपयांचा टॉप अप प्लान सगळ्यात स्वस्त आहे. यामध्ये १२४ IUC मिनिट्स मिळतात. यासोबतच आता जिओ दर १० रुपयांच्या टॉप अपमध्ये एक जीबी डेटा देत आहे. त्यामुळे अन्य नेटवर्कवर ग्राहक कॉल करण्यासाठी जितक्या वेळेस १० रुपयांचा टॉप अप करणार तितक्या वेळेस त्याला एक जीबी डेटा मोफत मिळणार आहे. जिओचे २०, ५०, १००, ५०० आणि एक हजार रुपयांचे टॉपअप व्हाउचर ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिले आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like