काश्मिरामध्ये बाप्पा ! भारत – पाकिस्तान ‘बॉर्डरचा राजा’ J & K ला रवाना, मुंबईहून केलं ‘प्रस्थान’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत – पाक ‘बॉर्डरचा राजा’ म्हणून ओळखला जाणारा जम्मू – काश्मीरमधील पूँछ येथील गणपती बाप्पा मुंबईहून काश्मीरच्या दिशेने रवाना झाला. काश्मिरातील ‘शिव दुर्गा भैरव मंदीर ट्रस्ट’ यांच्या द्वारे हा उपक्रम गेल्या दहा वर्षांपासून सुरु आहे.

Image

जम्मू काश्मीरच्या जवानांचा आत्मविश्वास वाढावा आणि येथील नागरिकांमध्ये समानतेची भावना यावी यासाठी ‘भारत पाकिस्तान बॉर्डर’च्या राजाची दरवर्षी स्थापना करण्यात येते. बॉर्डरचा हा राजा आता मुंबईहून किरण इशेर यांच्यासोबत जम्मू काश्मीरला जाण्यासाठी निघाला आहे.

Image

पूँछ येथील प्राचीन ‘शिव दुर्गा भैरव मंदीर ट्रस्ट’तर्फे गेली दहा वर्षे हा गणेशोत्सव साजरा केला जातो. सुरुवातीची काही वर्षे ही मूर्ती काश्मीरमधूनच आणली जात होती. परंतु ही मूर्ती महाराष्ट्राच्या मातीतच घडायला हवी, असा विचार करून ट्रस्टच्या उपाध्यक्षा ईशरदीदी व सामाजिक कार्यकर्ते छत्रपती आवटे यांनी ही मूर्ती मुंबईहून नेण्यास काही वर्षांपासून सुरुवात केली.

Image

सध्या भारत पाकिस्तान बॉर्डर वर सुरु असलेला तणाव हा येणारा बॉर्डर चा राजा नक्की दूर करेल याच आशेने दरवर्षी गणरायाचे आगमन काश्मिरात केले जाते आणि आता सुद्धा हा ‘बॉर्डरचा राजा’ मुंबईहून काश्मीरला जाण्यासाठी सज्ज झाला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –