पुणे : कोंढवा पोलिसांची ‘भिक्षुकांवर’ कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शुक्रवार दि.17 मे 2019 रोजी कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये प्रार्थनास्थळे, मस्जिद, मंदिर तसेच महत्त्वाच्या चौकांमध्ये भिक्षा मागत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी कोंढवा पोलीसांकडे आल्या होत्या. तसेच सध्या पवित्र रमजान महिना सुरू आहे. त्यामुळे कोंढवा पोलिसांनी तालब मस्जिद मध्ये नमाज पठणाच्या वेळी भिक्षा मागताना 6 भिक्षुकांना ताब्यात घेतले.

इकबाल झडप खान (वय 35, मुळगाव. राजस्थान), सरवर हैदर शेख (वय 40, मुळगाव. सोनेरी नांदेड), सुनील जेम्स आदळकर (वय 30, मुळगाव. घोरपडी, बालाजीनगर,आंध्र प्रदेश), मोहम्मद अब्दुल रहमान अहमद शेख (वाय 95, मुळगाव. बेंगलोर, काटन पेठ), बाळा संपत कांबळे (वय 34, मुळगाव. शहापूर, जिल्हा ठाणे), मोहम्मद हनीफ शेख (वय 32, मुळगाव. नेरळ, बउलापुर, नानकोहली. सध्या हे सर्वजण पुणे येथे फिरून रस्त्यावर राहत आहेत.) अशी त्यांची नावे आहेत. त्यानंतर या 6 भिक्षुकांवर महाराष्ट्र भिक्षा अधिनियम 1960 चे कलम 4 अन्वये खटला दाखल करून त्यांना न्यायालयात हजर केले.

न्यायालयाने भिक्षुकांना येरवडा येथील पुनर्वसन भिक्षा केंद्रात पाठवण्याचे आदेश दिले. भिक्षुकांना पुनर्वसन भिक्षा केंद्रात पाठवून समाजाच्या मूळ प्रवाहात आणणे हा यामागील उद्देश आहे. पुनर्वसन केंद्रामध्ये काही कालावधी नंतर भिक्षुकांना कोठे व कोणते प्रशिक्षण दिले जावे हे ठरवले जाते. या केंद्रात त्यांना शिवणकाम, झाडू बनवणे आदी कौशल्ये शिकवली जातात. परंतु हे शिकूनही ते स्वतःमध्ये सुधारणा न करता परत भिक्षा मागायला लागतात. या कारणामुळे शासनातर्फे चालवल्या जाणाऱ्या पुनर्वसन केंद्रातील भिक्षुकांची संख्या गत चार वर्षात 38 टक्के पर्यंत घटली आहे.

सदरची कामगिरी, माजी पोलिस उपायुक्त प्रकाश गायकवाड, माजी सहाय्यक पोलिस आयुक्त मिलिंद पाटील, कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा महादेव कुंभार, पोलीस उपनिरीक्षक सागर काळे, पोलीस हवालदार सुरेश भापकर, गिरमे, पोलीस शिपाई मिसाळ, चव्हाण यांनी केली आहे. सदरच्या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.