अजित पवारांच्या सोबत असलेल्या आ.अण्णा बनसोडेंच्या घर, कार्यालय समोर मोठा बंदोबस्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रातील सरकार स्थापन करण्यासाठी भाजप आणि अजित पवार यांनी २४ तासात बहुमत दाखवावे असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आज दिला. या पाश्वभूमी पिंपरी चिंचवड शहरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच प्रतिबंधात्मक कारवाई सुरु करण्यात आली आहे. कोणत्याही पक्षाचे सरकार येऊ, शहरात शांतता रहावी यासाठी पोलीस आयुक्तांनी दोन प्लॅन केले असून त्या पध्द्तीने कामकाज सुरु आहे.

महाराष्ट्रातील सरकार स्थापन करण्याचा पेच वाढला आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि आणखी गोंधळ वाढला. यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षांनी न्यायालयात धाव घेतली. दोन्ही बाजू ऐकून आज न्यायाधीशांनी निर्णय दिला. २४ तासाच्या आत भाजपा आणि अजित पवार यांनी बहुमत सिद्ध करावे आणि सायंकाळी पाच पर्यत सर्व आमदारांची शपथ विधी व्हावी असा निर्णय दिला आहे.

सध्या राज्यात राजकीय तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. शहरातील सर्व आमदारांच्या घरासमोर तसेच कार्यालयासमोर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. प्रतिबंधात्मक कारवाई सुरु केली आहे. नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत.

कोट
सरकार स्थापनेच्या पार्श्वभूमीवर शहरात योग्य बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. आमदार अण्णा बनसोडे यांच्या घरा समोर तसेच कार्यालयासमोर विशेष बंदोबस्त लावला आहे. बंदोबस्त कारणामुळे सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्या रजा बंद केल्या असल्याचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी सांगितले.

कायदा
सुव्यवस्था ठेवण्यासाठी सर्व ठिकाणी बंदोबस्त असून राजकीय अस्थिरता निर्माण करणारे तसेच नेत्यांच्या जवळीक असणारे गुंड यांच्यावर प्रतिबंधक कारवाई सुरु असल्याचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी सांगितले.