केडगावात दोन गटांत तुफान हाणामारी तडीपार गुंड गंभीर जखमी : शिवसेना कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – तडीपार असतानाही केडगावमध्ये फिरणारा गुंड मनोज कराळे व शिवसेना शिवसेना कार्यकर्ता सुनील सातपुते यांच्यात आज रात्री तुफान हाणामारी झाली. तडीपार कराळे हा गंभीर जखमी झाला आहे. शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते यांच्या सांगण्यावरूनच माझ्यावर हल्ला केला, असे जखमी कराळे याचे म्हणणे आहे. या घटनेमुळे केडगाव परिसरात तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, गेल्या अनेक दिवसांपासून कराळे व सातपुते गटांमध्ये वाद सुरू आहेत. महापालिका निवडणुकीसह इतर अनेक कारणांमधून त्यांच्यात संघर्ष सुरू आहे. आज रात्री पुन्हा कराळे व सातपुते आमने-सामने भेटले. मनोज कराळे हा तडीपार असूनही त्याच्या घरी आला होता. सुनील सातपुते, आबा सातपुते, प्रवीण सातपुते यांनी लाकडी दांडके, लोखंडी गजाने त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत तडीपार मनोज कराळे हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते यांच्या सांगण्यावरूनच हा जीवघेणा हल्ला केल्याचे कराळे यांचे म्हणणे आहे. पोलिसांनी याप्रकरणी आबा सातपुते याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

विरोधी गटाच्या सुनील सातपुते यानेही कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून मनोज कराळे याच्याविरुद्ध मारहाण करून दुखापत केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. केडगाव उपनगरात झालेल्या हाणामारीच्या घटनेमुळे काहीसा तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे. पोलिसांकडून आरोपींची धरपकड सुरू करण्यात आली आहे.

दिवसभर थकणाऱ्या हातांनादेखील ‘रिलॅक्स’ करणे गरजेचे

गंभीर आजार होण्यापूर्वी शरीर देते संकेत, वेळीच डॉक्टरकडे जा

शुगर व कोलेस्टेरॉलमुळे होऊ शकतो ‘व्हॅस्क्युलर ट्यूमर’

सौंदर्य प्रसाधनेसुद्धा वाढवतात मधुमेहाचा धोका ! घ्यावी ही काळजी

जाती-धर्मामुळे मानवतावादी दृष्टिकोनाला तिलांजली दिली जातेय – डॉ. गणेश देवी