चक्क पोलिस ठाण्यातच साप, पोलिसांची उडाली भंबेरी !

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन- पोलीस ठाण्यात अचानक साप आल्याने पोलिसांची चांगलीच भंबेरी उडाली. तब्बल एक तासाच्या प्रयत्नानंतर साप सापडला व तो सर्पमित्रांनी पकडला. त्यानंतर पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला. संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्यात आज रात्री हा प्रकार घडला.

घारगाव पोलीस ठाण्याचे नियमित कामकाज सुरू असताना आज रात्री अचानक पोलीस ठाण्याच्या आवारात साप दिसला. साप दिसतात पोलिसांची चांगलीच धांदल उडाली. रात्रीची वेळ असल्याने अंधारात साप नेमका कुठे लपला, याचा थांगपत्ताच लागेना. रात्री पुन्हा अचानक बाहेर येऊन काही गैरप्रकार होऊ नये, यासाठी पोलिसांनी काही सर्पमित्रांना बोलावून घेतले. सर्पमित्रांनी साप शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु काही उपयोग झाला नाही. बराच वेळ पोलिसांकडून सापाचा शोध सुरू होता. तब्बल एक तासानंतर पोलीस ठाण्याच्या आवारात पडलेल्या पाईपच्या फुटबॉलमध्ये साप दिसला. सर्पमित्रांनी त्याला अलगद पकडले. त्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

तब्बल एक तास पोलिस ठाण्यांमध्ये सापाची शोधाशोध होती. त्यामुळे अनेक पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. साप सर्पमित्रांनी हाती लागतात पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला.

आरोग्यविषयक वृत्त

गरोदरपणात ‘हे’ ४ ब्युटी प्रॉडक्ट कधीही वापरू नका

भाजलेल्या ठिकाणी चुकूनही लावू नका ‘या’ गोष्टी

जाणून घ्या गुणकारी आवळ्याचे फायदे

‘हाफकिन’मध्ये किफायतशीर औषधांची होणार निर्मिती

‘ग्रीन टी’ प्रमाणात घ्या… नाहीतर उद्भवू शकतात ‘या’ समस्या

मोडलेल्या हाडावर ‘गरम’ वस्तू टाकल्यास होईल नुकसान ; घ्या काळजी

चॉकलेट वॅक्सचे ‘हे’ फायदे, जाणून घ्या

पोटाची चरबी कमी न होण्याची ‘ही’ ९ मोठी कारणे, त्यासाठी ‘हे’ करा

वजन कमी करण्यासाठी ‘हे’ खाऊ नका

मासिक पाळीच्या दरम्यान विचार पूर्वक निवडा वापरण्यात येणारी साधने