वाळू उपसा करणाऱ्या यांत्रिक बोटी जिलेटिनच्या स्फोटात उध्वस्त

अहमदनगर : पोलीसनामा ऑलनाईन – चिंचणी धरणाच्या बॅकवॉटर मध्ये वडगाव शिंदोडी गावच्या शिवारात वाळू उपसा करणाऱ्या चार यांत्रिक बोटी जिलेटीन स्फोटात उद्धवस्त करण्यात आल्या आहेत. आज स्थानिक गुन्हे शाखेने महसूलच्या मदतीने ही कारवाई केली. या कारवाईत 12 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता.

याबाबत समजलेली माहिती अशी की, श्रीगोंदा तालुक्याचे हद्दीतील घोडनदीवरील चिंचणी धरणाचे बॅक वॉटरमध्ये वडगाव शिंदोडी गावचे शिवारामध्ये काही इसम यांत्रीक बोटीचे सहाय्याने चोरुन वाळू उपसर करीत आहेत, अशी माहिती पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांना मिळाली होती. त्यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ/विजयकुमार वेठेकर, पोना/रविंन्द्र कर्डीले, ज्ञानेश्वर शिंदे, कमलेश पाथरुट, संतोष लोढे, रणजित जाधव, संदीप घोडके, रोहीत
मिसाळ अशांनी मिळून श्रीगोंदा येथे जावून तहसिलदार श्री. महेन्द्र माळी/महाजन यांना सदरची माहीती कळविली.

तहसिलदार महेन्द्र माळी, महाजन, तलाठी जयसिंग मापारी यांचेसह वडगांव शिंदोडी गावचे शिवारात जावून खात्री केली. सदर ठिकाणी धरणाचे बॅक वॉटरमध्ये काही इसम चार यांत्रीक बोटीचे सहाय्याने वाळू उपसा करत असल्याचे दिसले. सदर वाळू उपसा करणारे इसम हे पोलीस पथक आल्याचे पाहून बोटी सोडून पळून गेले. सदर

इसमाबाबत व बोटींचे मालकाबाबत आजूबाजूस चौकशी केली असता काही एक माहीती मिळाली नाही. सदर ठिकाणी १२ लाख रुपये किंमतीच्या एकूण चार लोखंडी बोटी मिळून आल्याने सदरच्या बोटी महसूल पथकाने जिलेटीनच्या सहाय्याने स्फोट घडवून नाश करण्यात आलेल्या आहेत.

आरोग्यविषयक वृत्त-

‘पेनकिलर’ खात असाल तर ‘हे’ नक्की वाचा

‘मेकअप’ रिमूव्हसाठी बदाम तेल उत्तम

ऑफिसमध्ये जास्त वेळ खुर्चीवर बसताय मग बदला ‘या’ सवयी

‘गोड पदार्थ’ खाल्यावर लगेच ‘पाणी’ पिण्याने बिघडते आरोग्य

‘वजन कमी’ करण्यासाठी रात्री जेवत नसाल तर होईल ‘हे’ नुकसान

अंडरआर्म्ससाठी ‘डिओ’  विकत घेताना घ्या ‘ही’ काळजी

शरीराला ऊर्जा देणारी ‘खारीक’ ‘या’ आजारांनांही करते  दूर