पंतप्रधान मोदींचा ‘तो’ दावा खोटाच

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – स्वतःचे कपडे धुण्याचा मोदींचा दावा खोटा असून यावर सोशल मीडिया आक्षेप घेत आहे. मोदींच्या धोबीसंदर्भातील बातमीचे स्क्रीनशॉट शेअर करत आहेत. बॉलीवूड खिलाडी अक्षय कुमारने मोदींची मुलाखत घेतली. हि मुलाखत सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. नेटकरी मोदींच्या या खोट्या दाव्यावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. त्यावर राज ठाकरेंचा पॅटर्न नेटकरी वापरात आहे. राज ठाकरे सध्या लोकसभा निवडणुकीच्या सभा घेत असताना पाठपुराव्या सहित मोदींवर टीका करत आहेत.

अक्षय यांच्यासोबत मुलाखतीत बोलत असताना मोदी म्हणाले की, मी मुख्यमंत्री होईपर्यंत कपडे धूत होतो. यावर नेटकरी आक्षेप घेत असून मोदींच्या धोब्यासंदर्भातील बातमीचे स्क्रीनशॉट शेअर करत आहेत. अक्षय कुमारला दिलेल्या अराजकीय मुलाखतीत मोदींनी आपल्या जीवना विषयी दिलखुलास गप्पा मारल्या. यावर अक्षय कुमारनी मोदींना पेहरावाबद्दल प्रश्न केला, तर तेंव्हा मोदी म्हणाले मी गुजरातचा मुख्यमंत्री होईपर्यंत स्वतःचे कपडे स्वतःच धूत होतो. त्यावर आता एक बातमी व्हायरल होत आहे. मोदी मुख्यमंत्री होण्याआधी गुजरात संघाचे प्रचारक होते. त्यावेळी त्यांच्याकडे चांद मोहम्मद नावाचे धोबी कामाला होते. चांद मोहम्मद यांची एका इंग्रजी वेबपोर्टलला २३ ऑक्टोबर २०१७ रोजी बातमी आली कि चांद मोहम्मद यांचे निधन झाले.

मोदी यांच्याकडे १९७० पासून चांद मोहम्मद नावाचे धोबी होते. मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर २३ ऑक्टोबर २०१७ रोजी चांद यांचे निधन झाले होते. त्यावेळी मोदींनी चांद मोहम्मद यांचा कुटुंबियांना ५ लाखाची मदत केली. असा देखील उल्लेख त्या बातमीत आहे. चांद मोहम्मद यांची गोध्रामधील काजीवाड येथे यादगार नावाची लॉन्ड्री होती. त्यावेळी नरेंद्र मोदी बरेच वर्ष तिथे राहात होते. मोदी संघाचे प्रचारक असे पर्यंत चांद मोहम्मद धोबी मोदींकडे कपडे धुवायला होता. तरी मोदींनी मुलाखतीत सांगितले के मी गुजरातचा मुख्यमंत्री होईपर्यंत स्वतःचे कपडे स्वतःच धुवायचो असा खोटा दावा मोदींनी केला. पण धोबीच्या बातमीमुळे मोदींचा हा दावा खोटा ठरल्याचा आक्षेप होतोय.