नीरा नदीवरील ब्रिटिश कालीन पुलाची दुरवस्था, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे याकडे दुर्लक्ष

पुणे (नीरा) : पोलीसनामा आँनलाईन – पुणे-सातारा जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या नीरा नदीला मागील पंधरा दिवसांपूर्वी आलेल्या महापूरामुळे नदीवरील जुन्या ब्रिटिश कालीन पुलाची दुरवस्था झाली आहे. हा पुल वाहतुकीसाठी धोकादायक बनला राष्ट्रीय महामार्ग विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. या पुलाची राष्ट्रीय महामार्ग विभागाने तातडीने दुरूस्ती करण्याची मागणी होत आहे.

नीरा (ता.पुरंदर) व पाडेगांव (ता.खंडाळा) गावच्या हद्दीवरून वाहणाऱ्या नीरा नदीला ४ आँगस्ट रोजी महापुर आल्याने नीरा नदीवरील जुना ब्रिटिश कालीन पुल सुमारे चार दिवस पाण्याखाली होता. त्यामुळे नीरा नदीवरील ब्रिटिश कालीन पुलाचे चार-पाच कठडे तुटून पडले आहेत. तसेच पुलावरील डांबर मोठ्या प्रमाणात उखाडले आहेत . तर ब-याच मोबाईल कंपण्यांचे केबल पुरामुळे पुलावर अस्ताव्यस्त पडलेल्या आहेत. त्यामुळे नीरा नदीवरील ब्रिटिश कालीन पुल वाहतुकीला धोकादायक बनला असून दुरावस्था झाली आहे. याकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.

नीरा नदीवरील असलेल्या प्रसिद्ध
दत्त मंदिर व दशक्रिया विधी घाट आहे. त्यामुळे दत्त मंदिराकडे व दशक्रिया विधीला जाणाऱ्या लोकांची संख्या बरीच आहे. तसेच दत्तमंदिराकडे व दशक्रिया विधी घाटाकडे नदीवरील जुन्या ब्रिटिश कालीन पुलावरूनच जावे लागते. तसेच या पुलावरून ब-याच तरूण वर्गांची वर्दळ सुरू असते. त्यामुळे पुलाचे तुटलेल्या कठड्यामुळे मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने नीरा नदीवरील पुलाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नीरा, पाडेगांव परिसरातील नागरिक करीत आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like