जुन्या पेन्शनसाठी १८ जूनपासून राज्यव्यापी धरणे

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – जुन्या पेन्शनसंदर्भात अमरावती, अहमदनगर, बीड, नाशिक, जळगाव आदी जिल्ह्यांतील आलेल्या कृती समितीच्या सदस्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मात्र त्यांच्याकडून कुठलाही सकारात्मक तोडगा निघाला नाही. त्यामुळे १८ जूनपासून राज्यव्यापी धरणे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा कृती समितीच्या सदस्यांनी दिला आहे. प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, एक दिवसीय धरणे आंदोलन करून या आंदोलनाची व्याप्ती वाढविण्याचे आवाहन कृती समितीच्या राज्याध्यक्षा संगिता शिंदे यांनी केले आहे.

1 नोव्हेंबर 2005 पूर्वी विना अनुदान व अंशतः अनुदान सेवेतील शिक्षकांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी जुनी पेन्शन कृती समितीच्या शिष्टमंडळाने मुंबईत मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी शिक्षण संघर्ष समितीच्या राज्याध्यक्षा संगिता शिंदे, समन्वय समितीचे महेंद्र हिंगे यांनी चर्चा केली. या वेळी झालेल्या चर्चेत कोणतेही ठोस आश्‍वासन मिळाले नाही. शिक्षकांच्या सहनशिलतेचा अंत न पाहता पेन्शनच्या प्रश्‍नावर त्वरित निर्णय घ्यावा, अन्यथा कृती समितीच्या वतीने १८ जूनपासून आझाद मैदानावर सुरू होणाऱ्या आंदोलनाची रणनिती तयार केली जाणार असल्याची माहिती संगिता शिंदे यांनी दिली.

सरकारवर दबाव वाढविण्यासाठी संपूर्ण राज्यातील जुन्या पेन्शन योजनेतील कर्मचाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, एक दिवसीय धरणे आंदोलन करून या आंदोलनाची व्याप्ती वाढविण्याचे आवाहन शिंदे यांनी केले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

गरोदरपणा नंतरचा लठ्ठपणा नको ? मग ‘हे’ पाणी प्या

लठ्ठपणामुळे होऊ शकतात ‘हे’ १० गंभीर आजार

डिप्रेशनवर उपचार करा घरच्या घरी ; ‘ह्या’ सात सोप्या पद्धती

‘बल्जिंग डिस्क’ आजार माहीत आहे? जाणून घ्या कारणे