पडस्थळ – इंदापूर रस्ता बनला मृत्युचा सापळा

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) – इंदापूर तालुक्यातील उजणी काठावर असणार्‍या पडस्थळ ते इंदापूर या रस्त्याची अवस्था फारच दयनिय झाली आहे. जड वाहतुकीमुळे सर्वत्र रस्ता उखडला असुन रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ते अशी स्थिती सध्या आहे. रस्त्यात ठीक ठीकाणी मोठ-मोठे खड्डे पडले असल्याने प्रवासी, शालेय विद्यार्थी व ग्रामस्थांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. तर दोनचाकी मोटार सायकल, तीनचाकी रिक्षा, टमटम, छोटी मोठी वाहने यांना वाहन चालविताना तारेवरची कसरत करून वाहन सुरक्षीतपणे पोहचवावे लागत असल्याने रस्त्याचा प्रश्न गंभिर बनलेला आहे.

संबधीत प्रशासन व लोकप्रतिनिधी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक रहीवासी करत असुन खराब रस्त्यामुळे स्थानिकांना मात्र याचा मोठा त्रास सोसावा लागत आहे. प्रसंगी छोट्या मोठ्या अपघातालाही सामोरे जावे लागत असल्याने स्थानिक नागरिक रस्ता दुरूस्तीसाठी आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाचे इंदापूर तालुका कार्यध्यक्ष नितीन झेंडे यांनी आमचे प्रतीनिधीशी बोलताना सांगीतले.

स्थानिक लोकप्रतीनिधी हे पाच वर्षातुन एकदाच मते मागण्यासाठी गावात येतात. त्यावेळी जनतेच्या विकासाच्या मोठ मोठ्या गप्पा मारून मते मिळवुन निवडणूका जिंकतात व पाच वर्षे पुन्हा मतदाराकडे साधे फिरकतही नाहीत. रस्त्यासाठी निधी मंजूर केल्याच्या बातम्या प्रसारीत केल्या जातात परंतु मंजुर कामे कागदोपत्री पूर्ण होत असल्याने विकास मात्र जैसा थे असल्याचे नितीन झेंडे म्हणाले.

पडस्थळ व त्याच्या आजुबाजुला ग्रामिण भागात असणारी छोटी-मोठी गावं, वाड्यावस्त्या या ठीकाणच्या सर्व नागरिकांचे दळणवळणाचे मुख्य ठीकाण व बाजारपेठ हे इंदापूर असल्याने इंदापूरला येण्या जाण्यासाठी हाच मुख्य रस्ता आहे. मुख्य रस्ताच पूर्ण खराब झाल्याने ग्रामस्थ, जेष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी, यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. परंतु संबंधीत प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधी याकडे ढुंकुणही पाहण्यास तयार नाहीत.

कधी काही अणूचित प्रकार घडला तर रात्री अपरात्री याच खराब रस्त्याने प्रवास करावा लागतो, नादूरूस्त रस्त्यामुळे एसटी बसही वेळेवर येत नाही. यामुळे नागरीकांचे हाल होत आहेत. तर किरकोळ अपघात नेहमी होत आहेत. ह्या सर्व समस्यांविरोधात शासन व प्रशासन यांचे लक्ष वेधण्यासाठी पडस्थळ भागातील ग्रामस्थ रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याची माहीती नितीन झेंडे यांनी दिली.

आरोग्यविषयक वृत्त –