पिस्टल बाळगणारा कुख्यात गुन्हेगार पिंपरी गुन्हे शाखेकडून गजाआड

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – टोळी युद्धातून खून करून जेलमध्ये गेलेला आणि काही दिवसांपूर्वीच जेलमधून सुटलेल्या सराईत गुन्हेगाचा खून करण्यासाठी पिस्टल बाळगणाऱ्या कुख्यात गुन्हेगाराला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट १ ने गजाआड केले आहे. त्याच्याकडून दोन पिस्टल आणि चार जीवंत काडतुसे जप्त केली आहेत. गुरुदत्त उर्फ बाबा अशोक पांडे (वय-३२ रा. नारायण रसाळवाडा, भोसरी) असे अटक करण्यात आलेल्या कुख्यात गुन्हेगाराचे नाव आहे. त्याने जेलमधून सुटलेला सराईत गुन्हेगार ज्ञानेश्वर लांडगे याला मारण्यासाठी पिस्टल बाळगले असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

युनिटचे पोलीस शिपाई गणेश सावंत यांना एक व्यक्ती दिघी रोडवरील सिद्धेश्वर शाळेसमोर उभा असून तो पिस्टल विक्री करण्यासाठी आला असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे आणि बातमीदाराने केलेल्या वर्णनानुसार पोलिसांनी पांडे याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडीत घेतली असता त्याच्याकडे दोन पिस्टल आणि ४ जीवंत काडतुसे सापडली. त्याच्यावर भोसरी पोलीस ठाण्यात बेकायदा शस्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.

पांडे टोळीचा म्होरक्या
पांडे हा भोसरी पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याची भोसरी परिसरात टोळी असून तो टोळीचा म्होरक्या आहे. या टोळीचे आणि भोसरी भागात कार्यरत असलेल्या ज्ञानेश्वर लांडगे या दोन टोळ्यांमध्ये वारंवार वर्चस्व वादातून भाडणे होत असतात. याच वादातून २०१४ मध्ये आरोपी बाबा पांडे याने प्रतिक तापकीर आणि सँडी गुप्ता यांच्या मदतीने ज्ञानेश्वर लांडगे टोळीतील अक्षय काटेचा खून केला होता. आरोपी पांडे याच्यावर हाणामारी चोरी असे पाच गुन्हे भोसरी पोलीस ठाण्यात दाखल आहेत.

सराईत ज्ञानेश्वर लांडगे फरार
सराईत गुन्हेगार ज्ञानेश्वर लांडगे हा किशोर झेंडे याच्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये २०१५ पासून जेलमध्ये होता. तो जून महिन्यात जेलमधून सुटला आहे. ज्ञानेश्वर लांडगेचा खून करण्यासाठी किंवा स्वत:च्या संरक्षणासाठी पाडे याने पिस्टल बाळगले असल्याची शक्याता पोलिसांनी वर्तवली आहे. लांडगे हा जेलमधून सुटल्यापासून फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

ही कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे, सहायक पोलीस आयुक्त आर.आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्त तांगडे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, पोलीस उप निरीक्षक काळुराम लांडगे, पोलीस कर्मचारी प्रमोद लांडे, गणेश सावंत, सचिन उगले, प्रविण पाटील, मनोजकुमार कमले, विशाल भोईल यांच्या पथकाने केली.

सिनेजगत बातम्या
Video : प्रभासच्या साहोमधील पहिल्या गाण्याचा टीजर ‘आउट’ ; पहा प्रभास आणि श्रद्धाची ‘हॉट’ केमिस्ट्री

पॉर्न वेबसाईट, ‘तो’ युवक आणि ३०० युवती ; प्रकार पाहून पोलिस झाले ‘हैराण-परेशान’

मौनी रॉयच्या ‘त्या’ गाण्यावरील मोनालिसाचा ‘हटके’ डान्स !

Video : एकता कपूर पिंक कलरच्या ड्रेसमध्ये दिसली एकदम ‘हॉट’; बॉलिवूडबद्दल म्हणाली…

सोशल मीडियावर हिट अभिनेत्री कनक पांडेचा ‘वेस्टर्न’ लुक !

शूटिंग दरम्यान भाजली ‘ही’ अभिनेत्री

अभिनेत्री रानी चॅटर्जीचा १० वर्षांपूर्वीचा ‘तो’ फोटो व्हायरल !