वाद मिटवण्यासाठी गेलेल्या पोलिसाच्या खुनाचा प्रयत्न

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – वाद मिटवण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला तलवार मारण्याचा प्रयत्न करून खुनाचा प्रयत्न करण्यात आला. श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान ग्रामपंचायतीसमोर काल सायंकाळी ही खळबळजनक घटना घडली. याप्रकरणी रात्री उशिरा श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काल सायंकाळी टाकळीभान ग्रामपंचायत कार्यालयासमोर कांबळे यांचे कपड्याचे दुकानात टाकळीभान गावातील सोमनाथ बापू चितळे यांचे दुकानासमोर सायंकाळी ५ वाजता टाकळीभान गावातील सनी जाधव, राजू नागले, प्रशांत नागले, रविंद्र चंद्रभान बोडखे, गौतम कापसे, हर्षल बोडखे, विठ्ठल जाधव यांनी कांबळे यांचे दुकानात घुसुन दुकानाची नासधुस करीत होते.

त्यावेळी टाकळीभान गावातील गोविंद रणनवरे, रवी रणनवरे, अमोल रणपीसे, दिगंबर साठे, एक अज्ञात व्यक्ती ग्रामपंचायत कार्यालयासमोर येऊन गैरकायद्याची मंडळी जमवून हातात काठ्या घेऊन आपआपसात भांडणे करु लागली. तेव्हा श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार राजेंद्र पवार, पोलिस कर्मचारी राऊत यांनी त्यांचे भांडणे सोडवण्याचा प्रयत्न केला. एकाने पवार यांना तलवार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच पोलिस कर्मचारी पवार व योगेश राउत यांना शिवीगाळ, दमदाटी करुन तुम्ही पोलीस येथून निघून जा, असे म्हणून सरकारी कामात अडथळा आणला. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार राजेंद्र पवार यांच्या फिर्यादीवरून १२ जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोग्यविषयक वृत्त