पोलीस फ्रेंड्स वेल्फेअर असोसिएशनकडून पोलिसांना १५० स्पोर्ट्स बॅग्जचे वाटप

ADV

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पोलीस फ्रेंड्स वेल्फेअर असोसिएशन पुणे शहराच्यावतीने पोलीस कर्मचारी बांधवाना १५० स्पोर्ट्स बॅग्जचे वाटप करण्यात आले. पोलीस फ्रेंड्स वेल्फेअर असोसिएशनचे पुणे शहर उपाध्यक्ष संदीप गायकवाड व कोंढवा विभाग अध्यक्ष मुक्तार खान यांच्या हस्ते स्पोर्ट्स बॅग्जचे वाटप करण्यात आले.
Police

पोलीस फ्रेंड्स वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष गजानन भाऊ चिंचवडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आला. यामध्ये कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन, मंगलदास पोलीस चौकी रुबी हॉल रोड, लष्कर पोलीस स्टेशन, कौन्सिल हॉल पोलीस चौकी, कोंढवा वाहतूक विभाग पोलीस चौकी, सर्किटाऊस वाहतूक विभाग पोलीस स्टेशन आदी पोलीस स्टेशनमध्ये स्पोर्ट्स बॅग्जचे वाटप करण्यात आले .

ADV

Police
यावेळी इम्रान सय्यद, तनवीर शेख , मनोज किंद्रे, प्रदीप गायकवाड, तौसिफ़ शेख, ओम गायकवाड, साई गायकवाड, चेतन चव्हाण, सागर गवारे, सचिन किंद्रे, शाहरुख खान, गौसपाक पठाण, सुरेश गायकवाड, वैशाली संदीप गायकवाड, रुपाली खंडागळे, पूजा गवारे, सुनिता किंद्रे, बेबीताई निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/