#VIDEO : पुणेकरांना मानलं राव ! तळपत्या सूर्यालाही ‘असं’ लावलं कामाला

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – यंदाचा उन्हाळा चांगलाच तीव्र असून सूर्य आग ओकतो आहे. बुधवारी चंद्रपुरात सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली. चंद्रपूरचा पारा ४८ अंशांवर पोहोचला आहे. ही लाट अजून तीन दिवस राहणार असून हवामान खात्याने व प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. इकडे पुण्यात देखील तापमान ४० अंशाच्या आसपास पोहचले आहे. उन्हाळयात पापड वगैरे असे पदार्थ केले जातात हे तुमही ऐकले असेलच पण पुण्यातील एका गृहस्थांनी आपल्या चारचाकी वाहनात चक्क शेंगदाणे भाजायला ठेवले होते आणि कडक उन्हामुळे हे शेंगदाणे चक्क भाजून निघाले आहेत.

 

सुरेश भाले हे पुण्यातील सिंहरोड परिसरात राहणारे गृहस्थ आहेत. ते बँकेतील सेवानिवृत्त अधिकारी आहेत. त्यांनी आपल्या कारमधील डॅशबोर्डवर शेंगदाणे एका ताटात ठेवले होते. हे शेंगदाणे त्यांनी सकाळी १० वाजता ठेवले होते मात्र दुपारपर्यंत हे शेंगदाणे उत्तम प्रकारे भाजून निघाले. उन्हात भाजल्यामुळे शेंगदाण्यांवरील टरफले देखील निघाली आहेत. हे शेंगदाणे चवीला देखील उत्तम असल्याचे भाले सांगतात.