दौंडचे आ. कुल यांच्यावतीने पूरग्रस्त भागाला मदत निधी, मुख्यमंत्र्यांनी मानले FB वरून ‘आभार’

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – दौंडचे विद्यमान आमदार राहुल कुल यांनी राज्यातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस १,११,१११ रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राहुल कुल यांच्या कार्याचे कौतुक करत Thank you Rahul Kul for contribution of 1,11,111 /- towards CM Relief Fund Maharashtra Floods अशी पोस्ट आपल्या फेसबुक पेजवर टाकून आभार मानत राहुल कुल यांच्या कार्याचा गुणगौरव केला.

कोल्हापूर आणि सांगलीतील पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी दौंडने पुढाकार घेतला आहे. पश्चिम महाराष्ट्रात पुराने कहर केला असताना मदतीसाठी अनेक हात पुढे येत आहेत. त्यातच आ.कुल यांनी मदत करून त्यामध्ये मोठी भर टाकली आहे. मुख्यमंत्र्यांना धनादेश सुपूर्द करताना राहुल कुल यांचे सहकारी बाळा भेगडे, भीमराव तापकीर हे आवर्जून उपस्थित होते.

आरोग्यविषयक वृत्त

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like