पुण्यातील दारू दुकाने उघडण्यास जिल्हाधिकार्‍यांची परवानगी ! ‘या’ वेळतच चालू राहणार वाईन शॉप अन् बिअर शॉपी

पुणे  : पोलीसनामा ऑनलाइन – लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्याला आजपासून सुरुवात झाली आहे. ब्रेक लागलेल्या राज्याच्या अर्थव्यवस्थेला संजीवनी देण्यासाठी निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याअंतर्गत आता शहरातील वाईन शॉपला परवागी देण्यात आली आहे. मात्र पुण्यात दारू विक्रीवरू बराच घोळ निर्माण जाला होता. अखेर या वादावर आता पडदा पडला असून प्रशासनाने दारु विक्रीबाबत मोठी घोषणा केली आहे.

एकीकडे राज्य सरकारने मद्यविक्रीबाबत निर्णय घेतला असताना पुणे शहरात मात्र मद्यविक्री परवानगीबाबतचा संभ्रम कायम होता. कारण, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी अद्याप कोणतेही आदेश काढलेले नव्हते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनीच अद्याप आदेश दिले नसल्याने दारुची दुकाने उघडायची की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. अखेर शहरात दारू विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

पुण्यात दारु विक्रीबाबत अखेर जिल्हाधिकारी यांनी आज आदेश जारी केला आहे. पुण्यातील कंटेटमेंट झोन वगळून मद्यविक्रीला परवानगी देण्यात आली आहे. वाईन शॉप्स, बीअर शॉपी चालू होणार आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यंतच ही दुकाने चालू राहणार आहेत. पण सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून सशर्त परवानी देण्यात आली आहे. परंतु, शहरात रेस्टॉरंट बार मात्र बंदच राहणार आहेत, असा आदेश जिल्हाधिकारी यांनी काढला आहे.

यापूर्वी पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, आजपासून पुणे शहरातील कंटेटमेंट झोनमध्ये 91 चौरस किमीफुटावरून 10 किमी चौरस फुटावर आणला आहे. म्हणजेच आता पुणे शहराचं फक्त 10 टक्के क्षेत्रफळ कोरोना प्रतिबंधित म्हणून सीलबंद राहणार आहे. उर्वरीत 90 टक्के हरातील लॉकडाऊन निर्बंध आजपासून शिथिल केले आहेत. प्रत्येक गल्लीत 5 दुकाने उघडता येणार आहेत. पण पुणेकरांना सोशल डिस्टन्सिंग पाळावे लागेल, अशी माहिती त्यांनी दिली होती.