मान्सूनला ‘विलंब’, शेअर मार्केटमध्ये घसरणीच्या ‘लाटा’

मुंबई : वृत्तसंस्था – मान्सूनपूर्व सरी बरसल्या असल्या तरी शेअर मार्केटमध्ये घसरणीच्या ‘लाटा’ निर्माण झाल्याने मान्सूनच्या विलंबाचा बाजारावर परिणाम झाल्याचे मत तज्ज्ञांनी नोंदविले आहे.

शेअर बाजारात दोन दिवसांच्या तेजीनंतर बुधवारी घसरण झाली असून घसरणीनेच बाजाराची सुरुवात झाली आहे. मेटल आणि एनर्जी सेक्टर वगळता इतर क्षेत्रातील शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण दिसून आली. बाजार सुरू होताच निर्देशांक १४२ अंकानी घसरून ३९८०८.५७ वर आला होता. तर निफ्टीमध्येही ४५.१० अंकांनी घसरण होऊन निर्देशांक ११९२०.५० वर आला होता.

सुरुवातीच्या सत्रात २३० शेअरमध्ये मजबुती दिसली. तर ४३० शेअरमध्ये घसरण दिसून आली. यस बँक, एसबीआय, इंडियाबुल हाऊसिंग, ओएनजीसी, झी इंटरटेनमेंट, भारती एअरटेल, इन्फोसिस या शेअरमध्ये घसरण दिसून आली. तर डीएचएफएल, जेएसडब्लू स्टील, टाटा स्टील, स्टरलाईट टेक, मदरसनसूमी, आयटीसी आणि एशियन पेंट्स या शेअरमध्ये तेजी दिसून आली. आता देश परदेशातील विविध आर्थिक संस्थाचे अहवालही या आठवड्यात येणार आहेत. त्या आकड्यांवरुनही बाजाराला दिशा मिळणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त
अंघोळ करताना तुम्ही ‘या’ चूका तर करत नाही ना ?

डिप्रेशनवर उपचार करा घरच्या घरी ; ‘ह्या’ सात सोप्या पद्धती

अळूच्या भाजीने तुमचे वजन राहिल नियंत्रणात

Loading...
You might also like