९० लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्षासह ३ जणांवर गुन्ह दाखल

पोलीसनामा ऑनलाईन – दिव्यांग व निराधार महिलांची जमीन व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मंगलदास बांदल, राहणार शिक्रापूर तालुका शिरूर, दिगंबर गुलाब टाकळकर ,राहुल वसंत टाकळकर, दोघे राहणार हिवरे कुंभार, तालुका शिरुर, राम हरी शंकर दौंडकर राहणार करंजावणे, तालुका शिरूर, जिल्हा पुणे यांच्यावरआशा किसन पाचर्णे वय ५० राहणार हमाल नगर मार्केट यार्ड, पुणे, मुळगाव.तर्डोबावाडी ता. शिरुर या महिलेने शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ३०जानेवारी २००८ ते आज अखेर वरील आरोपींनी फिर्यादी व त्यांचे बहीण, आई या अपंग भोळ्या दिव्यांग व निराधार महिलांची जमीन त्यांना विश्वासात घेऊन संगनमत करुन त्यांचे नावे तर्डोबावाडी तालुका शिरुर येथे असलेल्या पाच एकर जमिनीची रहाते घर सोडून एक कोटींचा खरेदीव्यवहार केला व दि. ३० जुन २००८ रोजी रामहरी दौंडकर यांचे नावे  खरेदी करुन घेतली त्यापैकी
दहा लाख रुपये देऊन ९० लाख रुपये देण्याबाबत मंगलदास बांदल यांच्याकडे फिर्यादी यांनी
मागणी केली असता त्यांनी आज येतो उद्या देतो सांगत टाळाटाळ केली.

पैशाची मागणी केली असता हातपाय तोडून टाकून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे फसवणूक झाल्याबाबत फिर्यादी आशा किसन पाचर्णे यांनी आज दि. ८रोजी पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली असून या तक्रारी नुसार शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर करीत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

‘त्वचा’ होईल तजेलदार आणि वाढेल ‘डोळ्यां’ची क्षमता, दररोज ‘हे’ करा

पावसाळ्यात ‘मेकअप’ करताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या

तुमच्या ‘आयब्रो’ चा रंग अधिक डार्क करण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स

‘गुळ’ या आजारांवर ठेवतो नियंत्रण

द्रुतगती महामार्गावर भिषण अपघातात तीन ठार, एक गंभीर जखमी

माजी खासदार राजीव सातव यांचे मराठवाडा प्रदेश कार्यकारिणी च्या अध्यक्ष पदी नाव चर्चेत

अर्थसंकल्प सादर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ