सांगलीत एक पोलिस एक झाड ‘उपक्रम’ ; अधीक्षक सुहेल शर्मा यांची नाविन्यपूर्ण ‘कल्पना’

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्ह्यात एक पोलिस कर्मचारी एक झाड असा उपक्रम पोलिस दलातर्फे राबविण्यात आला. या उपक्रमा अंतर्गत पोलिस मुख्यालयासह ठाण्यांच्या परिसरात दोन हजार झाडांचे रोपण करण्यात आले. पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.

वृक्षषारोपण हा फक्त इव्हेंट न करता, झाडे जगविण्यासाठी एक झाड आणि एक कर्मचारी असा उपक्रम हाती घेतला. अधीक्षक शर्मा यांनी वृक्षारोपण करत जगविण्याचा निर्धार केला. तसेच परिसरात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वृक्षारोपण करत जगविण्याचा निर्धार केला. शर्मा म्हणाले, वृक्षसंपदा वाढविण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीतही वृक्षारोपण करण्यात आले आहे.

पुढील टप्प्यात ही मोहीम व्यापक प्रमाणावर हाती घेतली जाणार आहे. सध्या वड, पिंपळ, आंबा, चिकू, सिताफळ, आवळा, जांभूळ, चिंच, नारळ अशा झाडांचे रोपण करण्यात आले आहे. या वेळी निरीक्षक निशिकांत भुजबळ, एलसीबीचे निरीक्षक श्रीकांत पिंगळे, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक मिलिंद पाटील, विश्रामबाग पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल तनपुरे यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

आरोग्यविषयक वृत्त

‘ऐकावं ते नवलच’ ! तणावामुळे आयुष्य वाढणार ; घ्या जाणून

कच्चे ‘अंडे’ खा आणि ‘हे’ ४ फायदे मिळावा

स्त्रीयांप्रमाणेच पुरुषांनाही येतो ‘मेनोपॉज’, तुम्हाला माहित आहे का ?

‘ही’ ५ सौंदर्यप्रसाधने ठरू शकतात त्वचेसाठी ‘घातक’ !

बाहेरच्या फळांच्या ज्यूसमुळं आरोग्य बिघडतं, ‘ही’ 5 प्रमुख कारणं

मोड आलेल्या कडधान्याचं सेवन केल्यास होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

वजन कमी करण्याचे ‘हे’ १५ रामबाण उपाय, घाम देखील येणार नाही

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच