खा. सुप्रिया सुळेंना पाहताच अनेक मातांनी फोडला ‘हंबरडा’ ; सुप्रिया सुळेंनाही अश्रू अनावर

दौंड : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख)- पुणे सोलापूर महामार्गावर असणाऱ्या कदम वाक वस्ती येथील भीषण अपघातामध्ये यवतच्या ९ युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्या अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या युवकांच्या कुटुंबियांची आज बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली यावेळी अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या युवकांच्या कुटुंबियांची सुप्रिया सुळेंनी भेट घेतली यावेळी सुप्रिया सुळेंना पाहताच अनेक मातांनी हंबरडा फोडला यावेळी खासदार सुळे ही भावुक होऊन त्यांनाही अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.

कदम वाक वस्तीजवळ दौंड चे नऊ तरुण ठार झाले ही दुर्दैवी घटना कळल्यानंतर सुळेंनी आज तरुणांच्या कुटुंबीयांची यवत येथे येऊन भेट घेतली.

यावेळी त्यांनी नऊ युवकांच्या कुटुंबीयांचे घरी जाऊन सांत्वन केले. घरातली हाताशी आलेली मुलं अशी अचानक निघून जातात तेंव्हा त्यांच्या पालकांवर दुःखाचा किती मोठा डोंगर कोसळतो हे त्या ठिकाणी गेल्यावरच समजते त्यामुळे त्यांचे सांत्वन करीत असताना स्वतःच्याच भावना मात्र अनावर होत असल्याचे यावेळी सुळेंच्या चेहऱ्यावरून दिसत होते. सर्व कुटुंबियांची भेट घेऊन अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या युवकांना सुप्रिया सुळेंनी शेवटी श्रद्धांजली वाहिली.

आरोग्यविषय वृत्त –