‘में इस दिन को देखने की प्रतीक्षा कर रही थी’ ; सुषमा स्वराज यांचे मृत्यू पुर्वी काही क्षण आधीचे ‘ते’ ट्विट ठरले अखेरचे

नवी दिल्ली : भाजप नेत्या आणि परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे वयाच्या 67 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांना रात्री 9 वाजता दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तत्पूर्वी त्यांनी संध्याकाळी 7 वाजून 23 मिनिटांनी एक ट्विट केले होते.

त्या ट्विटमध्ये त्यांनी नरेंद्र मोदी यांचे काश्मीरसंबंधी घेतलेल्या निर्णयाबद्दल आभार मानले होते. त्यांनी म्हंटले की, प्रधानमंत्रीजी,तुमचे हार्दिक अभिनंदन. मी माझ्या जीवनात हा दिवस पाहण्याची वाट पाहत होती. अशा शब्दात सुषमा स्वराज यांनी ट्विटरवरून भावना व्यक्त केल्या होत्या.

मोदी सरकारने काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला राज्यसभेनंतर 6 ऑगस्ट रोजी मंगळवारी लोकसभेत मंजुरी मिळाली. लोकसभेत मंजुरी मिळाल्यानंतर सुषमा स्वराज यांनी हे ट्विट करून नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. याबरोबरच त्यांनी मी या दिवसाची वाट पाहत होते अशा भावना व्यक्त केल्या. मृत्यूपूर्वी सुषमा स्वराज यांची इच्छा पूर्ण झाली मात्र काही क्षणातच त्यांचे निधन झाले.