तारापूर स्फोट : मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून आर्थिक मदत जाहीर

पालघर : पोलीसनामा ऑलनाइन – तारापूर औद्योगिक वसाहतीमधिली M2 या प्लॉटमधील कंपनीत संध्याकाळी सातच्या सुमारास भीषण स्फोट झाला. यामध्ये कंपनी मालकासह आठ कामगारांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या घटनेनंतर सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. कंपनीमध्ये झालेल्या स्फोटाचे कारण अद्याप समजू शकले नाही.

AIMS या इंडस्ट्रियल प्रायव्हेट लिमिटेड या खासगी कंपनीत सकाळी भीषण स्फोट झाला. कर्मचारी काम करत असताना हा स्फोट झाला असून या स्फोटामुळे कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कंपनीत झालेल्या स्फोटाची तीव्रता प्रचंड होती. स्फोटानंतर मोठा आवाज झाला. आवाजामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच स्फोटामुळे कंपनीच्या आवारातील एक इमारत कोसळल्याचे वृत्त आहे.

स्फोट इतका भयंकर होता की कंपनीचे छत उडून दूर फेकले गेले. स्फोटानंतर कंपनीत भीषण आग लागली. यामध्ये सात कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला. स्फोट झाला त्यावेळी कंपनीत अधिकारी नसल्यामुळे त्यांचे प्राण वाचले. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या दाखल झाल्या. तसेच सात रुग्णवाहिकाही दाखल झाल्या. या घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. स्फोटाचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/