दोंडाईचा बस स्थानकातून चोरट्याने महिलेची पर्स लंपास केली

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – तालुक्यातील दोंडाईचा बस स्थानक परिसरातून नंदुबार येथील रेशन दुकानदार महिलेच्या पर्स मधील रोकड, सोने, चांदीचे दागिने, दुकानाच्या चाब्या चोरट्यांने लंपास केल्या.

सविस्तर माहिती की,सविता विजय भोई रेशनदुकानदार गंधर्व कॉलनी प्लॉट नं.33. अ. शहादा रोड. ता. जि. नंदुबार कामकाज निमित्त दोंडाईचात आल्या होत्या कामकाज आटोपून परत नंदुबारला जाण्यासाठी बस स्थानकात बसची वाट पाहत असताना गर्दीचा फायदा घेत चोरट्याने महिलेची पर्स लंपास केली. पर्स मधील रोख 12 हजार रोख, 1 ग्रँमचे सोन्याचे कानातले, 1 भार चांदीच्या साडीच्या पिना, रेशन दुकानाच्या चाब्या असा अंदाजे 16 हजार रुपयांचा माल चोरट्याने लंपास केला. महिलेने दोंडाईच्या पोलीस ठाणे गाठत लेखी तक्रार दिली आहे. पुढील तपास पो. कॉ. जगदाळे करत आहे.

आरोग्यविषय वृत्त –