विराट कोहलीच्या नावावर ‘हा’ नकोसा वाटणारा ‘विक्रम’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली हा वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत दुसऱ्या डावात शुन्यावर बाद झाला आणि एक नकोसा वाटणारा रेकॉर्ड त्याच्या नावावर जमा झाला आहे. क्रिकेटमधील सर्वोत्तम चार क्रिकेटपटू मध्ये सर्वात जास्त वेळा शुन्यावर बाद होण्याचा विक्रम विराटच्या नावावर लागला आहे.

क्रिकेट जगतातील चार सर्वोत्तम क्रिकेटपटूंमध्ये विराट कोहली, केन विलियमसन, स्टीव स्मिथ आणि जो रुट यांचा समावेश होतो. विराट कोहली हा आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये ९ वेळा शुन्यावर बाद झाला आहे. या अगोदर कोहली आणि केन विलियमसन हे दोघेही ८ वेळा शुन्यावर बाद झाले होते. केनला मागे टाकत कोहलीने भोपळाही न फोडता बाद होऊन एक विक्रम स्वत:च्या नावावर लावून घेतला आहे.

जो रुट हा ७ वेळ आणि स्टिव स्मिथ सर्वात कमी ४ वेळा कसोटी क्रिकेटमध्ये शुन्यावर बाद झाला आहे. विराट कोहली आपल्या ७९ कसोटीत ९ वेळा शुन्यावर बाद झाला आहे. त्यापैकी ४ वेळा तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये २०११ मध्ये ब्रिजटाऊन कसोटीत तो वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वप्रथम शुन्यावर बाद झाला होता.

आरोग्यविषयक वृत्त