‘मंजिले उन्ही की होती है ,जिनके सपनो मे जान होती है’ : विश्वास नांगरे पाटील

लासलगांव : पोलीसनामा ऑनलाइन (राकेश बोरा) – देशाचे भविष्य ज्यांच्या हातात आहे मातृभूमिवर ज्यांचे प्रेम आहे जे उद्याचे आयडोल आहे मि त्यांच्या साठी आलो आहे .शिकणं हे तुमच्या रोजच्या जीवनाचा अविभाज्य घटक समजा! शिक्षण कधीही थांबवू नका. ते तुम्हाला नेहमीच मार्ग दाखवेल. आपली पॅशन आणि आपलं काम एकच असेल, तर आयुष्य आनंदी होणं कठीण नाही.जीवनाचे ब्लू प्रिंट करण्याचे हे वय असल्याने मेहनत घ्या वेळेचे नियोजन करा, स्वतावर विश्वास ठेवून प्रयत्न करा यश तुमचंच आहे,” अशा प्रेरणादायी शब्दांत नाशिक पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी लासलगांव महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

येथील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी युवकाचे आयडोल विश्वास नांगरे पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते मंचावर लासलगाव महाविद्यालयाचे अध्यक्ष संजय होळकर, सेक्रेटरी गोविंदराव होळकर, अनिल डागा, वाल्मीकराव गायकवाड, चंद्रशेखर होळकर प्राचार्य दिनेश नाईक आदी मंचावर उपस्थित होते.

मंजिले उन्ही की होती है ,जिनके सपनो मे जान होती है, सिर्फ पंखो से कुछ नही होता ,हौसलेसे उडान होती है.या शायरीने सुरवात करत जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर आपले ध्येय निश्चित करा त्यासाठी नियोजन करा मेहनत घ्या यश आपलेच आहे. विश्वास नांगरे पाटलांनी ग्रामीण भाग ते आयपीएस संपूर्ण प्रवास हा विद्यार्थ्यांशी अगदी मनमोकळेपणाने शेअर केला. जीवनाचा प्रवास करत असताना स्वप्नाच्या पाठीमागे लागा समाजात तुमचे अस्तित्व महत्त्वाचे आहेत आयुष्य एकदाच मिळते ते कसे जगायचे तुम्ही ठरवा. ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्याच्या पूर्तीसाठी मेहनत घेतली पाहिजे. या वयात तुम्ही स्वतःला चांगल्या सवयी लावल्या पाहिजे असे मत विश्वास नांगरे-पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/