‘टँकरमध्ये राजकारण करू नका’ : सदाशिव लोखंडे यांनी घेतली आढावा बैठक

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – समन्यायी पाणी वाटपाचा कायदा झाला नसता, तर ११ टीएमसी पाणी खाली गेले नसते. गावांमध्ये कुणीही टँकरचे राजकारण करू नये. पाणीवाटपाचे व्यवस्थित नियोजन करावे, असे आवाहन खासदार सदाशिव लोखंडे यांनी दुष्काळ टंचाई आढावा बैठकीत केले.

संगमनेर यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनातील सभागृहात बुधवारी आयोजित पाणी टंचाई आढावा बैठकीत लोखंडे बोलत होते. व्यासपीठावर प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले आदी उपस्थित होते.

खासदार लोखंडे यांनी टंचाई आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दुष्काळ निवारणासाठी योग्य उपाययोजना करण्याचे आदेश दिले. शिवसेनेचे तालुकाप्रमुख आहेर म्हणाले, पिण्याच्या पाण्याचा टॅँकर सुरू करावा, यासाठी काकडवाडी ग्रामस्थांनी प्रस्ताव दिला होता. मात्र, भीषण पाणी टंचाई असूनही तो सुरू झाला नाही. पारेगाव येथे तलाठी नसल्याने ग्रामस्थांची कामे रखडली आहेत. तेथे तलाठ्याची नेमणूक करावी.