महिला पोलिसाला शिवीगाळ, दमदाटी करणाऱ्या दाम्पत्याला शिक्षा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – शहर वाहतूक शाखेच्या महिला पोलीस कर्मचाऱ्यास शिवीगाळ, दमदाटी मराठी करणाऱ्या दाम्पत्याला जिल्हा व सत्र न्यायालय प्रत्येकी एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. आज दुपारी हा निकाल देण्यात आला.

अविनाश सुरेश पाटील, शर्मिला अविनाश पाटील (दोघे रा. आनंदऋषी मार्ग, मार्केड यार्ड, अहमदनगर) ही शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. जिल्हा न्यायाधीश क्र, ५ प्रविण चतुर यांनी हा निकाल दिला. आरोपीस भा.दं.वि. क. ३५३, ५०४, ५०६ सह ३४ अन्वये दोषी धरून दोन्ही आरोपींना प्रत्येक कलमास १ वर्ष सक्तमजुरी व प्रत्येक कलमास १,000/- रूपये दंड अशा ६,०००/- रूपये दंडाची शिक्षा ठोठावली.

सदर घटनेची थोडक्यात हकिकत अशी कि, दि.१४/०५/२०१५ रोजी महिला पोलीस कॉन्स्टेबल वसुधा किसन भगत (शहर वाहतूक शाखा) भिंगारवाला चौकात नेमणुकीस असताना एक पांढ-या रंगाची हिरो होंडा कंपनीची अ‍ॅक्टीव्हा मोपेड गाडी नं. एम.एच.१६, ए.एस.२२५ नो एन्ट्रीमधुन घातली असताना सदर वाहनचालक आरोपी शर्मिला अविनाश पाटील यांना वाहन परवाना दाखवा, असे सांगितले असता तिने वाहन परवाना दाखविला.

सदर आरोपी यांनी गाडी नो एन्ट्रीमधुन घातली असल्याने महिला पोलीस कॉन्स्टेबल वसुधा किसन भगत यांनी त्यांना ‘तुम्ही नो एन्ट्रीमधुन गाडी चालविली आहे, तुम्हाला १००/-किंमतीची सरकारी पावती फाडावी लागेल’ असे म्हणाल्या. सदर आरोपी त्यांना उलट शब्दांत बोलली की, ‘पोलीस हे भिकारीच आहेत. चिरीमिरी करिता असेच रस्त्यावर उभे राहून पैसे गोळा करतात. सगळी पोलीस जात अशीच आहे’, असे बोलून वाईट शिवीगाळ केली व तिने तिच्या पतीस मोबाईलवरून फोन करून बोलावून घेतले.

तिचा पती तात्काळ भिंगारवाला चौकात आला. महिला पोलीस भगत व स.फौ. वाघेला या दोघांना म्हणाला, ‘तुम्हाला काय अधिकार आहेत. तुम्ही मला ओळखले नाही, मी कोण आहे? काय करू शकतो’, असे म्हणून दोन्ही पोलीस कर्मचा-यांना शिवीगाळ केली व सरकारी कामात अडथळा आणला.

या प्रकरणी महिला पोलिस कर्मचारी भगत यांच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले आहे. सदरचा खटला हा मा.तदर्थ जिल्हा न्यायाधीश क.५, श्री. प्रविण चतुर यांचे न्यायालयात चालला. सदर खटल्यामध्ये महिला पोलीस वसुधा किसन भगत, सहा.फौजदार सुभाष नानाजी वाघेला, पो. हे.कॉ. शंकर कान्हु आहेर, तपासी अधिकारी यांच्या साक्षी सरकार पक्षातर्फे नोंदविण्यात आल्या. न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून दाम्त्याला दोषी ठरवून शिक्षा ठोठावली.

सिनेजगत बातम्या

हनीमूनवर ‘इंटिमेट’ झाले न्यू मॅरीड कपल ‘चारु आणि राजीव’, रोमॅटिंक अंदाजात केले ‘लिप लॉक’

व्हिडिओ शेअर करत शिल्पा शेट्टीने मागितला राज कुंद्राला ‘किस’

‘या’ चित्रपटात अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसणार अभिनेत्री ‘कंगना रणौत’ !

अभिनेत्री कंगना रणौतची बहिण रंगोलीने साधला दीपिका पादुकोणवर ‘निशाणा’ !

दुबईच्या प्रशासकाची ‘राणी’ २७१ कोटी घेवून ब्रिटीश ‘बॉडीगार्ड’सह पळून गेल्याचं उघड ; लंडनमध्ये करतेय ‘मौज’

सौंदर्यामुळे नव्हे तर ‘या’ ४ चित्रपटामुळे बदलले खा. अभिनेत्री नुसरत जहॉंची ‘लाईफ’

Video : प्रभासच्या साहोमधील पहिल्या गाण्याचा टीजर ‘आउट’ ; पहा प्रभास आणि श्रद्धाची ‘हॉट’ केमिस्ट्री

पॉर्न वेबसाईट, ‘तो’ युवक आणि ३०० युवती ; प्रकार पाहून पोलिस झाले ‘हैराण-परेशान’

मौनी रॉयच्या ‘त्या’ गाण्यावरील मोनालिसाचा ‘हटके’ डान्स !

Video : एकता कपूर पिंक कलरच्या ड्रेसमध्ये दिसली एकदम ‘हॉट’; बॉलिवूडबद्दल म्हणाली…

सोशल मीडियावर हिट अभिनेत्री कनक पांडेचा ‘वेस्टर्न’ लुक !

शूटिंग दरम्यान भाजली ‘ही’ अभिनेत्री

अभिनेत्री रानी चॅटर्जीचा १० वर्षांपूर्वीचा ‘तो’ फोटो व्हायरल !

‘बेबी डॉल’ सनी लिओनीच्या ‘त्या’ फोटोंनी सोशलचे वातावरण ‘गरम’