TV चॅनेलची अँकर ‘प्रिया’ची गळफास घेऊन आत्महत्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   देशभरात कोरोना काळात आत्महत्यांचे प्रमाण खुप वाढल्याचे दिसत आहे. अलिकडच्या काही दिवसात सामान्य लोकांपासून ते काही प्रसिद्ध व्यक्तींनी आपले जीवन संपवल्याचे दिसून आले आहे. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपुतच्या आत्महत्येने तर संपूर्ण देशात मोठी खळबळ उडाली होती. दोनच दिवसांपूर्वी मराठी अभिनेत्री मयुरी देशमुखचा अभिनेता पती आशुतोष भाकरेने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली होती. आता टीव्ही चॅनेलची अँकर प्रिया जुनेजा हिने शुक्रवारी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे प्रकरण समोर आले आहे. तिने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सोशल मीडयावर या घटनेनंतर अनेकांनी दु:ख व्यक्त केले आहे. तिने आत्महत्या का केली असावी, असा प्रश्न तिच्या मित्रपरिवारासह अनेकांना पडला आहे.

प्रिया ही मूळची पंजाबची असून तिने गुरू जंबेश्वर युनिव्हर्सिटी हिसारमधून पदवीचे शिक्षण घेतले होते. प्रिया मॉडेल सुद्धा होती, तसेच रेडिओसाठी सुद्धा तिने काम केले होते. प्रियाच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर तिला ओळखणारे अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत. तिच्या एका मित्राने सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, असे काय झाले की तिने आत्महत्या केली असावी. नुकतेच तिच्याशी बोललो होतो, तेव्हा ती खुप आनंदात होती. तिच्याकडे नोकरी होती, आर्थिक स्थितीही चांगली होती. अँकरिंगचा अनुभव होता. मग अशा कोणत्या त्रासदायक गोष्टीमुळे तिने हे केले, कोणती गोष्ट तिला त्रास देत होती, ज्याबद्दल ती बोलली नाही?

कोरोना व्हायरसच्या काळात देशात आत्महत्यांचे सत्र वाढले असल्याचे माध्यमातून येणार्‍या बातम्यांवरून प्रकर्षाने दिसून येत आहे. सुशांत सिंह राजपूरच्या आत्महत्येने तर संपूर्ण देश हळहळला होता. आता दोन दिवसांपूर्वी मराठी अभिनेत्री मयुरी देशमुखच्या पतीने सुद्धा आत्महत्या केल्याने अनेकांना धक्का बसला. अभिनेता आशुतोष भाकरे याने नांदेडमधील राहत्या घरात आत्महत्या केली. धक्कादायक म्हणजे त्याने सुशांतच्या आत्महत्येनंतर एक व्हिडिओही पोस्ट करून माणूस आत्महत्या का करतो यासंदर्भात विश्लेषण केले होते. आशुतोष काही दिवसांपासून अस्वस्थ होता. बुधवारी सकाळी त्याने गळफास घेतल्याचे आढळून आले.