‘टॅक्सी ड्रायव्हर’ गेमच्या वेडापायी मुलीने सोडले घर, शेवटी सापडली ‘या’ ठिकाणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तराखंडच्या पंतनगर भागातील एक मुलगी घरातून बाहेर पडली आणि दोन आठवड्यानंतर घरी परतली. टॅक्सी ड्रायव्हर २ या गेमने प्रेरित होऊन ती घर सोडून फिरायला निघून गेली. त्यानंतर दिल्लीमध्ये पोलिसांनी तिला पाहिल्यानंतर तिचे साहसी कार्य समाप्त झाले.

दिल्लीतील कमला मार्केटमध्ये पोलिसांनी तिला फिरताना पाहिल्यानंतर तिच्याकडे चौकशी केली. यावर ती अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानमध्ये मेडिकलचे शिक्षण घेत असलेल्या आपल्या भावाला भेटण्यासाठी ती या ठिकाणी आल्याचे तिने पोलिसांनी सांगितले. मात्र पोलिसांनी दरडावून विचारल्यानंतर तिने सर्व खरी गोष्ट सांगितली.

पोलिसांना तिच्याजवळ कागदाचा एक तुकडा मिळाला. ज्यामध्ये एक फोन नंबर लिहिला होता. त्या फोन नंबरच्या आधाराने पोलिसांनी तिच्या शाळेत संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांना ती १७ दिवसांपासून गायब असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी तिच्या कुटुंबाशी संपर्क साधला. त्यानंतर तिला तिच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टॅक्सी ड्रॉयव्हर २ या गेममुळे तिने हे पाऊल उचलले होते. या गेममध्ये खेळाडूं या टॅक्सिच्या मागे निघतात. आपल्या ग्राहकांबरोबर एका मोठ्या शहराचा प्रवास करतात. १ जुलै रोजी या मुलीने १४ हजार रुपये घेऊन घर सोडले. त्यानंतर तिने ऋषिकेश, हरिद्वार, उदयपुर, जयपुर, अहमदाबाद आणि पुण्यापर्यंत तिने प्रवास केला. या मुलीने रात्रीच्या वेळी प्रवास केला आणि दिवसा ती शहरात फिरत असे. मुलीच्या मैत्रिणीने याविषयी बोलताना सांगितले कि, ती एकलकोंडी असून सतत व्हिडीओ गेम खेळत असते.

दरम्यान, पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवताना ते काय करत आहेत. त्याचबरोबर सोशल मीडियावर ते किती सक्रिय आहेत याकडे देखील लक्ष देण्याची गरज असल्याचे पोलिसांनी यावेळी सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त –