कपिल शर्माच्या पत्नीबद्दल भारती सिंगने केला खुलासा, म्हणाली गर्भवती असून देखील….

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कपिल शर्मा सोबत शोचा प्रत्येक सदस्य दर आठवड्याला धमाका करतो, मग ते कृष्णाचे नृत्य असो, भारतीचा अभिनय असो, चंदनची चर्चा असो किंवा किकू शारदा चे विनोद असो. सर्व त्यांच्या भूमिकेने लोकांची मने जिंकण्यासाठी पुरेसे आहेत.

अलीकडेच या शोच्या सह-अभिनेत्री भारती सिंगने तिची मुलाखत एका वृत्तसंस्थेला दिली होती, ज्यात तिने कपिल शर्मा आणि त्याची पत्नी गिन्नी चतरथशी संबंधित बर्‍याच गोष्टीही सांगितल्या. भारती हीने मुलाखतीदरम्यान सांगितले की, कपिल शर्माची पत्नी गिन्नी चतरथ गर्भवती झाल्यानंतरही तिने ‘द कपिल शर्मा शो’ च्या टीमची खूप काळजी घेतली. याशिवाय मुलाखतीत भारती सिंगने कपिल शर्माला ‘भैय्या’ संबोधले.

मुलाखतीत कपिल शर्मा आणि गिन्नी चतरथ याबद्दल बोलताना भारती सिंग म्हणाली, “गिन्नी एक अद्भुत व्यक्ती आहे. जेव्हा जेव्हा ‘द कपिल शर्मा शो’ ची टीम तालीम घेण्यासाठी कपिलच्या घरी जाते तेव्हा ती स्वतःच आम्हाला जेवण देते. कपिलच्या घरात तीन कुक असले तरी, गिन्नी स्वतः सर्व काम पाहते आणि आवश्यकतेनुसार त्यांना सूचना देते.” कपिलबद्दल भारती सिंह म्हणाली की, “कपिल भाऊ सगळ्यात बेस्ट आहेत. प्रत्येकजण वाईट काळातून जातो पण मला आनंद आहे की तो पूर्ण ताकदीने परत आला.”

कपिल शर्मा आणि गिन्नी चतरथ लवकरच आई- वडील होणार आहेत. एका मुलाखतीत कपिल शर्मा म्हणाला की, हा काळ तिच्यासाठी तसेच संपूर्ण कुटुंबासाठी खूप खास आणि भावनिक आहे. तो म्हणाला, “माझे संपूर्ण कुटुंब माझ्या मुलाचे स्वागत करण्यास उत्सुक आहे. आम्ही उत्साहाने आमच्या मुलासाठी लहान वस्तू खरेदी करण्यास सुरवात केली आहे. ”

आरोग्यविषयक वृत्त –

काकडीचे ‘हे’ १५ अद्भूत आरोग्यवर्धक लाभ, जाणून घ्या

अंडर आर्म्सचे केस काढण्यासाठी ‘रेजर’ वापरत असाल तर ‘हे’ जरूर वाचा

‘या’ सोप्या ६ उपायांनी काही मिनिटांत दूर होईल कानदुखी, जाणून घ्या

कोथिंबीरचे ‘हे’ ९ फायदे, अशाप्रकारे करा वापर

कोरफड लाभदायक आहेच, पण होऊ शकतात ‘हे’ ७ दुष्परिणामही, जाणून घ्या

‘सेक्स’बाबत तुम्हालाही पडत असतील ‘हे’ 10 प्रश्न तर जाणून घ्या त्यांची उत्तरे

पन्नाशीनंतरही तरुण राहण्यासाठी स्त्री-पुरुषांनी करावीत ‘ही’ १६ कामे

दररोज ‘सेक्स’ केल्यास सुधारतो शुक्राणूंचा दर्जा, करा ‘हे’ ७ घरगुती उपाय

तुम्ही जर प्रेग्नेंट असाल तर ‘या’ ८ गोष्टींची विशेष काळजी घ्या