केरळ गोल्ड तस्करी प्रकरणात NIA चे सांगलीत छापे; डिप्लोमॅटिक बॅगेजमधून दुबईतून आणले होते ‘सोने’

सांगली : दुबईहून केरळमध्ये डिप्लोमॅटिक बॅगेजमधून ३० किलो सोने सापडल्याचे प्रकरण आता थेट सांगलीपर्यंत येऊन पोहचले आहे. एनआयएने (NIA) सांगली जिल्ह्यातील आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर तालुक्यात छापे टाकण्यात आले आहेत. जुलै २०२० मध्ये केरळमधून सांगली जिल्ह्यात तब्बल १०० किलो सोने तस्करी केल्याचे आतापर्यंतच्या एनआयएच्या (NIA) तपासात उघड झाले आहे.

या तस्करी प्रकरणातील एक प्रमुख आरोपी महंमद मन्सूर पी हा ९ जून रोजी दुबईहून कालिकत विमानतळावर आल्यानंतर एनआयएने त्याला अटक केली आहे.
त्याला न्यायालयाने अधिक चौकशीसाठी ५ दिवसांची एनआयए कोठडी दिली आहे.
या तस्करी प्रकरणात एनआयएने आतापर्यंत २० जणांविरुद्ध दोषारोप पत्र दाखल केले आहे.

महंमद मन्सूर व मोहम्मद शफी व इतरांनी ते दुबईत असताना राजनैतिक अधिकार्‍यांच्या नावाने पार्सल पाठवून त्याद्वारे सोन्याची तस्करी करण्याचा कट आखण्यात आल्याचे एनआयए तपासात उघड झाले आहे.
त्यातून एनआयएने महंमद मन्सूर विरोधात इंटरपोलद्वारे समन्स बजावले होते.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

केरळच्या त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका डिप्लोमॅटिक बॅगेजमधून ३० किलो सोने दुबईतून तस्करी करुन जुलै २०२० मध्ये आणण्यात आले होते.
राजनैतिक अधिकार्‍यांच्या सामानाची विमानतळावर तपासणी होत नाही़. याचा गैरफायदा घेऊन ही तस्करी सुरु होती.
या तस्करीच्या रॅकेटमधील मुख्य संशयित स्वप्ना सुरेश ही केरळच्या सत्ताधारी माकपच्या डाव्या लोकशाही आघाडी सरकारची निकटवर्ती आहे.

त्यातून भाजपने निवडणुकीपूर्वी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन सरकारवर निशाणा साधला आहे. याप्रकरणाशी संबंधीत मुख्य सचिव एम. शिवशंकर यांना मुख्यमंत्री विजयन यांना पदावरुन हटवले होते. याचा तपास एनआयए करीत आहेत.एनआयएने याप्रकरणी सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात काही सराफाच्या दुकानावर छापे टाकले.

तसेच आटपाडी, कवठे महांकाळ, तासगाव येथेही काही जणांची दुकाने, घरांवर छापे घालून त्यांना समन्स बजावले आहे.
तसेच सांगली रेल्वे स्टेशनमध्येही याबाबत चौकशी केल्याचे सांगण्यात येत आहे.

केरळ तस्करीप्रकरणातील काही जणांना एनआयएने NIA अटक केल्यानंतर त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत तस्करी करण्यात आलेले हे सोने सांगलीमध्ये आणण्यात आले.
तेथे त्याचे दागिने घडविण्यात आले असल्याची माहिती पुढे आली.
त्यातून हे छापे घालण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

यापूर्वीही दिल्ली रेल्वे स्टेशनवर ८३ किलो सोन्याची बिस्कीटे पकडण्यात आली होती़
त्यातील आठ जण हे सांगली जिल्ह्यातील असल्याचे उघड झाले होते़

हे देखील वाचा

कोरोनापासून वाचण्यासाठी दुधात ‘या’ 4 गोष्टींचा समावेश करा, वेगानं वाढेल Immunity

13 जून राशिफळ : ‘या’ 5 राशींसाठी दिवस लाभाचा, नशीब चमकणार, इतरांसाठी असा आहे रविवार

जाणून घ्या उन्हाळ्यात होणार्‍या ‘या’ त्रासावरील रामबाण उपाय

कोरोना संकटात सापडलेल्या 50 मुलांची ‘आई’ बनली महिला पोलीस रेहाना शेख

मुलांना चांदीच्या भांड्यात खायला देणे ठरेल फायदेशीर, होतील ‘हे’ फायदे; जाणून घ्या
ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

Web Titel :  NIA raids sangli district Kerala gold smuggling case