Maharashtra Police | कडक सॅल्यूट ! कोरोना संकटात सापडलेल्या 50 मुलांची ‘आई’ बनली महिला पोलीस रेहाना शेख

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना महामारीमुळे (Corona) अनेक लोकांवर संकटाचा डोंगर कोसळला आहे. अनेकांना कोरोनामुळे आपल्या जवळच्या लोकांना गमवावं लागलं आहे. तर कोरोना संकटामुळे अनेकांचे रोजगार गेल्याने त्यांच्या मदतीसाठी (Help) अनेक दानशूर लोक पुढे सरसावले आहेत. काही लोक आपल्या मर्यादेच्या बाहेर जाऊन लोकांना मदत करत आहेत. मुंबई पोलीस (Mumbai Police) दलात देखील असेच एक उदाहरण आहे. यामुळे महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) दलाची मान उंचावली आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

महिला कॉन्स्टेबलने घातली 50 मुले दत्तक
मुंबई पोलीस कॉनस्टेबल Mumbai Police Constable रेहाना शेख (Rehana Shaikh) यांनी महाराष्ट्रातील (Maharashtra) 50 गरजू मुलांना दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे (Decided to adopt 50 needy children). रेहाना शेख यांनी सांगितले की, माझ्या मित्राने मला शाळेची काही छायाचित्रे दाखवली. त्यानंतर मला असे वाटले की या मुलांना माझ्या मदतीची आवश्यकता आहे. म्हणून मी 50 मुले दत्तक घेतली. त्यांचा 10वी पर्यंतचा शिक्षणाचा सर्व खर्च मी करणार आहे. रेहाना शेख यांनी 50 मुलांना दत्तक घेण्याचा निर्णय घेऊन समजापुढे एक माणुसकीचे अद्भुत उदाहरण ठेवले आहे. (I will pay all the expenses for education up to 10th standard)

 

रेहाना शेख यांच्याकडून इतरही मदत

रेहना शेख (वय-40) यांनी रायगड (Raigad) येथील 50 गरीब मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे. याशिवाय त्यांनी 54 लोकांना प्लाझ्मा, ऑक्सिजन, रक्त (Plasma, oxygen, blood) आणि रुग्णालयाची मदत केली आहे. रेहाना शेख यांचा मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नागराळे (Mumbai Police Commissioner Hemant Nagarale) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पोलिसांच्या कर्तव्यासह सामाजिक जबाबदारी (Social responsibility, including police duty) पार पाडण्यासाठी पोलीस आयुक्त हेमंत नागराळे Commissioner Hemant Nagarale यांनी आपल्या कार्यालयात बोलावून त्यांना प्रमाणपत्र (Certificate) देऊन सत्कार केला.

 

मुलीच्या ईदच्या खरेदीचा खर्च मुलांसाठी खर्च

रेहाना शेख यांनी सांगितले की, मागील वर्षी रायगडमधील शाळेबद्दल माहिती मिळाली. मुख्याध्यापकांशी बोलून त्या ठिकाणी पोहचल्यावर लक्षात आले की, बहुतेक मुले गरीब कुटुंबातील आहेत. त्यांच्या पायात चप्पलही नव्हती. माझ्या मुलीचा वाढदिवस (Birthday) आणि ईदच्या (Eid) खरेदीसाठी मी काही बचत केली होती. जी मी मुलांसाठी खर्च केली.

यामुळे मिळाली प्रेरणा
2000 साली कॉन्स्टेबल म्हणून पोलीस दलात रुजू झालेल्या रेहाना शेख यांनी सांगितले की, मागील वर्षी त्यांनी एका हवालदाराच्या आईसाठी इंजेक्शन मिळवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांना प्रोत्साहन मिळाले आणि अधिकाधिक लोकांना मदत केली. यातून त्यांना लोकांना मदत करण्याची प्रेरणा मिळाली.

वडिल आणि पती देखील पोलीस दलात
रेहाना यांचे वडील अब्दुल नबी बागवान हे मुंबई पोलिसातून उपनिरीक्षक म्हणून निवृत्त झाले आहेत. त्यांचे पती देखील पोलीस दलात कार्यरत आहेत. रेहाना शेख एथलीट आणि हॉलीबॉलपटू (Athletes and volleyball) राहिल्या आहेत. 2017 मध्ये श्रीलंकेत (Sri Lanka) त्यांनी दोन सुवर्ण आणि एक रौप्यपदक (Gold and silver medal) जिंकले आहे.

Wab Title :- mumbai police constable rehana sheikh adopts 50 children will help on education up to 10th standard

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

COVID-19 in India : 70 दिवसानंतर कोरोनाच्या सर्वात कमी केस, 24 तासात आली 84 हजार प्रकरणे; 4002 जणांचा मृत्यू

चुकूनही करू नका LIC चे ‘हे’ काम, अन्यथा विमा कंपनी करू शकते कठोर कायदेशीर कारवाई; जाणून घ्या

Adar Poonawalla Security | सुरक्षेची मागणी करताच सुरक्षा पुरवणार, राज्य सरकारची न्यायालयात ग्वाही

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा