13 जून राशिफळ : ‘या’ 5 राशींसाठी दिवस लाभाचा, नशीब चमकणार, इतरांसाठी असा आहे रविवार

मेष
horoscope 13 june 2021 : दिवस संमिश्र परिणामांचा आहे.
नोकरी, व्यवसायात मेहनतीची गरज आहे, तरच यश मिळेल.
संततीला अडचणीचा सामना करावा लागेल.
अचानक शुभवार्ता समजेल.
कुटुंबातील वाद संपेल.
कुणातही उणीवा काढू नका, वाद होऊ शकतो.

वृषभ
इतर दिवसांच्या तुलनेत दिवस उत्तम आहे.
आरोग्य राहील, पण घरात भांडणामुळे तणाव राहू शकतो.
घराबाहेर वागणे संतुलित ठेवा.
लोक तुमचे म्हणणे चुकीचे समजून वाद निर्माण करू शकतात.
व्यापारात व्यवहार स्पष्ट, चोख ठेवा.
नोकरीत शत्रु त्रास देऊ शकतात, सावध रहा.
अधिकार्‍यांशी सलोखा ठेवा.

मिथुन
दिवस संमिश्र आहे. धार्मिक आणि सामाजिक कार्यात भाग घ्याल.
मान सन्मान वाढेल.
सायंकाळी आरोग्याच्या बाबतीत सतर्क रहा, गर्दीची ठिकाणे टाळा.
व्यापारात काही नवीन बदल कराल, भविष्यात लाभ होईल.
रखडलेले सरकारी काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.

कर्क
दिवस सामान्य आहे.
इच्छा नसतानाही एखाद्या भांडणात पडाल, जे कायदेशीर होऊ शकते, सतर्क रहा.
ऑफिसमध्ये कामाची जबाबदारी व्यवस्थित न सांभाळल्याने अधिकारी नाराज होतील.
व्यापारात अचानक धनलाभ होईल.
संततीच्या भविष्यासाठी पैसे खर्च कराल. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होईल, संतुलन ठेवा.

सिंह
दिवस आर्थिकदृष्ट्या चांगला आहे.
नवीन काम किंवा कराराची सुरूवात करणे शुभ ठरेल.
भविष्यासाठी बचत कराल.
दाम्पत्य जीवनात धावपळ राहील.
सरकारी कामात गोंधळ वाढेल.

कन्या
दिवस संमिश्र परिणामांचा आहे.
व्यापार नोकरीत जास्त मेहनतीनंतर यश मिळेल.
घरातील कामांसाठी धावपळ होईल.
सायंकाळी अनावश्यक खर्च होतील.
जोडीदारासाठी भेटवस्तू खरेदी कराल.
विद्यार्थ्यांना शिक्षणातील बाधा दूर करण्यासाठी शिक्षकांची आवश्यकता भासेल.

तुळ
दिवस धनवृद्धीचा आहे. स्वतंत्र विचारांमुळे मनातील गोष्ट सहज जाणून घ्याल, लाभ होईल.
एखादी गोष्ट घरातील व्यक्तींना पटवून देण्यात यश येईल, त्याच्या गरजांची पूर्तता कराल, खर्च कराल.
आईशी वाद होऊ शकतो, पण वाणीवर नियंत्रण ठेवा. नोकरीत अधिकार वाढतील.

वृश्चिक
दिवस अपेक्षेपेक्षा लाभदायक आहे. व्यापारात अपेक्षेपेक्षा जास्त लाभ मिळेल.
जोडीदाराला कुठेतरी फिरायला घेऊन जाल.
कुटुंबातील एखाद्या सदस्याचे आरोग्य बिघडू शकते.
कार्यक्षेत्रात सुरूवातीला थोडा त्रास होईल, नंतर स्थिती अनुकूल होईल.
संततीचे चांगले काम पाहून आनंद होईल.
विवाहाचा प्रस्ताव मंजूर होईल.

धनु
दिवस व्यस्ततेचा आहे. कोणतेही काम करताना त्यामध्ये यश उशीराने मिळेल, निराशा होऊ शकते, पण प्रयत्नानंतर यश नक्की मिळेल.
घरातील ज्येष्ठांचे वागणे निराजनक राहील.
गुंतवणूक टाळा, नुकसान होऊ शकते.
सायंकाळी जोडीदार आणि संततीसोबत वेळ घालवाल, मानसिक तणाव थोडा कमी होईल.

मकर
दिवस भाग्याचे अनुकूल परिणाम देणारा आहे.
कामात ठराविक वेळेनंतर धनलाभ होईल.
जीवनातील आनंद वाढेल.
सुख साधनांवर खर्च कराल.
घरात मंगलकार्यावर चर्चा होईल.
श्रीमंत व्यक्तीशी ओळख होईल.
आरोग्याच्या बाबतीत सावध रहा आणि बाहेरचे खाणे टाळा.
व्यापारात रखडलेली कामे पूर्ण कराल.
राजकारणात प्रयत्न केल्याने जनसमर्थन वाढेल.

कुंभ
सकाळपासून शुभवार्ता समजतील. शुभवार्ता मिळाल्याने संतती आणि पत्नीवरील प्रेमाची भावना वाढेल.
व्यापारात मनातील आयडिया ताबडतोब अमलात आणा, लाभ होईल.
ज्येष्ठांच्या आशीर्वादाने कामात यश मिळेल.
सायंकाळ मित्रांसोबत आनंदात घालवाल.
सरकारी नोकरीत एखाद्या मैत्रिणीमुळे पदोन्नती मिळेल.
अचानक धनलाभ होईल.

मीन
दिवस उत्तम फलदायक आहे.
घर, व्यापारातील सर्व महत्वाची कामे पूर्ण करण्यात यश मिळेल.
कर्ज सहज मिळेल.
रखडलेली कामे पूर्ण करण्याच्या योजनेत यश मिळेल.
घरातील ज्येष्ठ आणि नोकरीत अधिकार्‍यांपासून सावध रहा कारण मतभेदामुळे वाद होऊ शकतो.
व्यापारात नवीन योजना लाभदायक ठरतील.

हे देखील वाचा

कोरोना संकटात सापडलेल्या 50 मुलांची ‘आई’ बनली महिला पोलीस रेहाना शेख

 

उन्हाळ्यात तेलकट त्वचेसाठी घरच्या घरीच बनवा फेस मास्क, स्किन राहील फ्रेश अन् ग्लोईंग, जाणून घ्या

 

देवेंद्र फडणवीस यांचा ठाम विश्वास, म्हणाले – ‘कोणी कितीही स्ट्रॅटेजीस् तयार केल्या, तरी 2024 लाही मोदीच’

 

शाम्पूने नाही तर घरगुती गोष्टींने केस धुवा; ‘हे’ डोक्यातील कोंडा दूर करेल

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : horoscope today aaj che rashifal horoscope 13 june 2021