पोलीसनामा ऑनलाइन टीम – Nia Sharma | टीव्ही अभिनेत्री निया शर्मा ( Nia Sharma ) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती काही काळापासून पोल डान्स शिकत आहे, ज्याचे व्हिडिओ निया अनेकदा शेअर करत असते ( Nia Sharma’s Pole Dance ). आता तिने तिचा असा एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये पोल डान्स करताना तिची प्रकृती खूपच खराब झाली आहे. व्हिडीओ शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये सांगितले की, पोल डान्स करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणं असं आहे.
निया शर्माने ( Nia Sharma ) तिचे दोन व्हिडिओ इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. पहिल्या व्हिडिओमध्ये ती पोल डान्स करताना दिसत आहे. यादरम्यान ती स्पोर्ट्स ब्रा आणि गुलाबी रंगाच्या शॉर्ट्समध्ये दिसत आहे. पोल डान्स संपल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसतो.
याशिवाय तिने आणखीन एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती खांबावर उलटा डान्स करते. व्हिडिओमध्ये एका इन्स्ट्रक्टरचा ( Nia Sharma’s Instructor ) आवाज ऐकू येतो. निया शर्मा त्या सूचनांप्रमाणे करत असल्याचं दिसत आहे. यादरम्यान तिची प्रकृती बिघडते आणि ती जोरात श्वास घेते आणि लगेच खांबावरून खाली उतरते आणि जमिनीवर बसते. हे व्हिडीओ शेअर करताना नियाने कॅप्शनमध्ये लिहिले की, “याला पोल डान्स कोण म्हणतं, हे तर मृत्यूचं आमंत्रण (Death Invitation-Nia Sharma ‘s Caption) आहे, हे तुमच्या मृत्यूच्या वॉरंटवर सही करण्यासारखे आहे.”
Web Title : Nia Sharma | nia sharma condition worsens while learning pole dance watch video
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Eknath Khadse | जळगावच्या बोदवड नगरपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा; एकनाथ खडसेंना धक्का