निफाडचा ‘पारा’ घसरला, किमान तापमानाची ‘नोंद’

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाईन – देशाच्या उत्तरेकडील हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि लडाख या राज्यांमध्ये बर्फ वृष्टी होत असल्याने उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे 8.8 अंश सेल्सिअस किमान तापमानाची निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्राच्या हवामान विभागात नीचांकी नोंद झाली.

गेल्या काही दिवसांपासून थंडीत चढ-उतार होत असल्याने बुधवारी 14 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली होती तर आज अचानक 8.8 अंश सेल्सिअस किमान तापमानापर्यंत पारा खाली आल्याने निफाड तालुका गारठून निघाला आहे.

या गारठ्यातुन उब मिळवण्यासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्या जात आहे या कडाक्याच्या थंडीचा मानवी जीवना बरोबर शेती पिकांवरही चांगला-वाईट परिणाम होताना दिसत आहे. गहू ,हरभरा या पिकांना फायदा होतो तो तर द्राक्षांवर याचा परिणाम होतो.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/