निगडी  : एसटी बसच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

निगडी  : पोलीसनामा ऑनलाईन

रस्ता क्रॅस करत असताना भरधाव वेगात जाणाऱ्या एसटी बसची धडक बसून तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात रविवारी रात्री तीनच्या सुमारास निगडी येथील भक्ती शक्ती चौकात घडला. याप्रकरणी बस चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रविंद्र प्रमोद आहेर (वय-२९ रा. पुर्णानगर, चिंचवड) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. अल्ताफ खान नवाजखान पठाण (वय-३८ रा. मु.पो. पिंपळा धायगुड, ता आंबेजोगाई, जि. बिड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या बस चालकाचे नाव आहे. याप्रकरणी मयत रविंद्र आहेर याचा भाऊ किरण आहेर (वय-३२, रा. पुर्णानगर, चिंचवड) याने निगडी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे.

[amazon_link asins=’B0756RF9KY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3ef10fa1-785c-11e8-bf56-8d22db4300c0′]

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री निगडी येथील पीएमपीएमएल बस डेपो ते ट्रान्सपोर्टनगर रस्ता ओलांडत असताना रविंद्र याला पठाण चालवत असलेल्या एसटी बसची धडक बसली. यामध्ये गंभीर जखमी होऊन रविंद्र याचा मृत्यू झाला. याप्रकरणी बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास निगडी पोलीस करीत आहेत.